Next
तटकरे, मुंडेंचे गावकऱ्यांसमवेत श्रमदान
प्रेस रिलीज
Monday, April 09 | 03:41 PM
15 0 0
Share this story

दहीवडी (सातारा) : हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आठ एप्रिलला हातात कुदळ, घमेल घेत शेतकऱ्यांसोबत श्रमदानात सहभाग घेतला.

पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या सातव्या दिवसाची सुरुवात रविवारी सातारामधून करण्यात आली. दहिवडीच्या सभेला जाताना वावरहिरे येथे पानी फाउंडेशन आयोजित ‘सत्मेव जयते वॉटरकप स्पर्धे’तील शेतकरी श्रमदान करत होते. त्यांच्या श्रमदानात ‘राष्ट्रवादी’चे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, दीपक सोळुंके यांनी सहभाग घेतला. तटकरे, मुंडे यांनी कुदळ मारत खोदले आणि घमेल घेत माती टाकली.

या अगोदर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे दर्शन घेतले. शेतकऱ्यांसोबत श्रमदानात सहभागी होत काही काळ श्रमदान करून गावकऱ्यांच्या या श्रमास यश मिळो गाव कायम दुष्काळ मुक्त होवो, अशी सदिच्छा व्यक्त करून सभेकडे रवाना झाले. ‘राष्ट्रवादी’तील नेत्यांच्या सहभागामुळे गावकऱ्यांत उत्साह दिसून आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link