Next
‘सिस्टिमा बायो’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
प्रेस रिलीज
Saturday, July 06, 2019 | 10:51 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘सिस्टिमा बायो’ या कंपनीला लॅटीन अमेरिका, आफ्रिका आणि भारतात शेतकर्‍यांपर्यंत स्वच्छ बायोगॅस ऊर्जा आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय ‘अ‍ॅश्डेन अॅवॉर्ड २०१९’ म्हणून गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार एक ते पाच जुलै २०१९ दरम्यान झालेल्या लंडन क्लायमेट अ‍ॅक्शन वीकमध्ये घोषित करण्यात आला.

‘सिस्टिमा बायो’ने एक नाविन्यपूर्ण आणि परवडणारी बायोगॅस प्रणाली तयार केली आहे जी गुणवत्तापूर्वक सेंद्रिय खतांचा उत्पादन करत असताना जनांवराच्या विष्ठेपासून स्वच्छ आणि गंधविरहीत स्वयंपाकासाठी इंधन बनवते.

प्रदूषित कुकस्टोव्ह जगभरातील चार दशलक्ष लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात आणि या गटामध्ये पुरस्कारासाठी जगभरातील बरेच अर्ज प्राप्त झाले होते. बायोगॅस, बायोमास गोळ्या आणि द्रवरूप पेट्रोलियम गॅस यांसारख्या तंत्रज्ञानावर, तसेच व्यवसाय आणि ग्राहक वित्त मॉडेल या श्रेणीत बर्‍याच संस्थेने कार्य केले आहे. स्वच्छ ऊर्जा श्रेणीतील या वर्षीच्या पुरस्कारासाठी अंतिम यादीत असलेल्या नामवंत कंपन्यांच्या यादीतून ‘सिस्टिमा बायो’ला निवडले गेले आहे.

या विषयी बोलताना ‘सिस्टिमा बायो’चे संचालक अलेक्झांडर ईटन म्हणाले, ‘त्यावेळी आमच्याकडे पाच वर्षांचा डेटा होता तसेच काम करण्यासाठी आमच्या बायोडायजेस्टरसाठी नवीन पेटंटदेखील होता. बाजारपेठेत खूप चांगली मागणीचे संकेत असल्याने आम्ही चांगल्या पद्धतीने विक्री आणि जोडणी करण्यास यशस्वी झालो आहोत.’

‘कंपनी लहान शेतकर्‍यांसोबत गरिबी, अन्न सुरक्षा आणि हवामानातील बदल या समस्यांचा सामना करण्यासाठी, तसेच नवीन जैविक विघटन तंत्रज्ञानाची ओळख याबरोबरच शेतकऱ्यांना अधिक उत्पादक, कार्यक्षम बनविण्यासाठी प्रशिक्षण आणि वित्तपुरवठा करण्याद्वारे काम करणे सुरू ठेवले आहे. आता, आम्ही जगभरातील आमच्या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि स्थापना करणार्‍या २०० लोकांची एक टीम आहोत, जगभरात आम्ही सकारात्मक प्रभाव पाडू शकत असल्याचा हा पुरस्कार पुरावा आहे,’ असे ईटन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search