Next
सोलनकर यांचा गुणवंत रयत सेवक म्हणून सन्मान
BOI
Wednesday, January 02, 2019 | 03:49 PM
15 0 0
Share this article:

रयत शिक्षण संस्थेचे आश्रमशाळा प्रकल्पाधिकारी पी. एन. सोलनकर यांचा गुणवंत सेवक म्हणून सत्कार करताना संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील. शेजारी संजीव पाटील, रामसेठ ठाकूर, शहाजी डोंगरे आदी.

सोलापूर : सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे आदिवासी आश्रमशाळा प्रकल्पाधिकारी पी. एन. सोलनकर यांचा गुणवंत रयत सेवक म्हणून संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यविभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष संजीव पाटील होते.

या वेळी व्यासपीठावर मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामसेठ ठाकूर, शहाजी डोंगरे उपस्थित होते. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सोलनकर यांची रयत शिक्षण संस्थेने आश्रमशाळा प्रकल्पाधिकारी म्हणून निवड केली होती. त्यांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर आश्रमशाळांतील बरेच प्रश्न मार्गी लावले. संस्थेच्या आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच त्यांना या शाळांमध्ये आर्थिक शिस्त लावण्यात मोठे यश आले.

त्यांच्या या कामाची दाखल घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्थेचे चेअरमन डॉ. पाटील यांच्या हस्ते त्यांचा गुणवंत सेवक म्हणून विषेश सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना सोलनकर म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळांमध्ये नाविन्यपूर्ण बदल करण्यासाठी मला संस्थचे व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, मध्यविभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष संजीव पाटील, मोखाडा कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. रयत शिक्षण संस्था नेहमीच चांगले काम करणाऱ्या सेवकांच्या पाठीशी असते. माझ्या आश्रमशाळेतील कामकाजाची दखल घेऊन माझा सन्मान केल्याचा मला आनंद होत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सागर भांगे , उमरगा About 173 Days ago
अभिनंदन सर ! छान बातमी आहे .
0
0

Select Language
Share Link
 
Search