Next
पाणीपुरीच्या १० हजार पुऱ्यांपासून १० फुटी गणेशमूर्ती
एरंडवणे येथील ‘गणेश भेळ’च्या दुकानातील मूर्ती
BOI
Saturday, September 15, 2018 | 03:28 PM
15 0 0
Share this article:

एरंडवणे येथील ‘गणेश भेळ’च्या दुकानातील पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून बनविलेला गणपतीबाप्पा

पुणे : गणेशोत्सवात गणपतीबाप्पाची वेगवेगळी रूपे साकारली जातात. आपली कल्पकता लढवून विविध ठिकाणी विविध साहित्यापासून गणेशमूर्ती बनविल्या जातात. अशा वेगवेगळ्या रूपांतील गणपतीबाप्पा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुण्यातील असेच एक आगळेवेगळे गणेशरूप पाहायला लोकांची गर्दी होत आहे. ही मूर्ती चक्क पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून बनविलेली आहे. ‘गणेश भेळ’चे दिनेश आणि रूपेश गुडमेवार यांच्या एरंडवणे येथील दुकानात ही मूर्ती बसविण्यात आली आहे. पाणीपुरीसाठी वापरल्या जाणाऱ्या १० हजार पुऱ्यांपासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. मूर्तीची उंची तब्बल १० फूट आहे. अमेरिकन शेवपुरी आणि शंभर द्रोणांचाही त्यासाठी वापर करण्यात आला आहे. 

प्रशांत साळुंके यांनी १५ दिवसांत हा बाप्पा साकारला असून, यामध्ये गणपतीबाप्पा स्वत: भेळ करून ग्राहकांना देत आहे, अशी संकल्पना आहे. या आगळ्यावेगळ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होत असून, विशेषतः लहान मुलांना हा बाप्पा खूप आवडत आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या साहित्यापासून बनलेली ही गणरायाची मूर्ती लक्ष वेधून घेते.

‘यापूर्वी २०१३मध्येदेखील साडेतीन हजार पुऱ्या वापरून बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली होती,’ असे दिनेश आणि रूपेश गुडमेवार यांनी सांगितले.

बाप्पाची आरती करताना ‘गणेश भेळ’चे दिनेश व रूपेश गुडमेवार आणि कर्मचारी

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search