Next
रस्किन बाँड
BOI
Wednesday, November 15 | 11:42 AM
15 0 0
Share this story

भारतीय मातीशी तादात्म्य पावलेले अँग्लो-इंडियन लेखन रस्किन बाँड यांच्या सहा रोमांचक कथांचा हा गुलदस्ता आहे. या कथांचा अनुवाद रमा हर्डीकर-सखदेव यांनी केला आहे. मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे हे लेखन मोठ्यांनाही गुंतवून ठेवणारे आहे.

‘सीता आणि नदी’, ‘बोगद्यातला वाघ’, ‘गरुडाची नजर’, ‘तो किपलिंग होता...’, ‘टिमोथी’ आणि ‘ढोलीतला खजिना’ या सहा कथांचा पुस्तकात समावेश आहे. बाँडच्या कथांमध्ये निसर्ग हा अविभाज्य भाग असतो. तसे ते निसर्ग वाचणारे लेखक आहेत आणि निसर्गातून शिकवण वाचकांपर्यंत समर्थपणे पोहोचवणारे लेखक आहेत. याचा प्रत्यय याही कथांमधून येतो. या कथांमध्ये जंगलची वाट आहे, गडद अंधारी जंगल आहे, पशु-पक्ष्यांचे आवाज आहेत. एकूणच संवेदनशील लेखन.

प्रकाशक :
रोहन प्रकाशन
पाने : १०२
किंमत : १५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link