Next
‘विशेष मतदार नोंदणी अभियानाचा लाभ घ्यावा’
‘भाजप’ प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Saturday, February 23, 2019 | 01:41 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘मतदार नोंदणीसाठी राज्यभरात २३ आणि २४ फेब्रुवारी २०१९ दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी व नसल्यास आपल्या बुथवर नाव नोंदविण्यासाठीचा अर्ज दाखल करावा,’ असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी २२ फेब्रुवारी २०१९ रोजी केले.

भांडारी म्हणाले, ‘निवडणूक आयोगातर्फे नागरिकांच्या सोईसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या दिवशी सर्व बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे एक जानेवारी २०१९ या दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध असेल; तसेच नमुना क्रमांक सहा, सात, आठ व आठ (अ) हे मतदार नोंदणी व नावातील दुरुस्ती, पत्ता बदल आदींसाठी आवश्यक अर्जाचे नमुने उपलब्ध असतील. मतदार यादीतून नावे सुटलेल्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी ‘भाजप’ व अन्य पक्ष संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या या मोहिमेचा लाभ घ्यावा.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search