Next
माडिया भाषेतील पहिल्या पुस्तकाची निर्मिती
‘माडिया शिकू या’ पुस्तकाचे एक जुलैला प्रकाशन
BOI
Friday, June 28, 2019 | 04:16 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तर भागातील आदिवासींच्या ‘माडिया’ भाषेतील लिखित स्वरूपातील पहिले पुस्तक पुणे विद्यापीठातील जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे. 

‘माडिया शिकू या’ असे या पुस्तकाचे नाव असून, त्याचे प्रकाशन सोमवारी, एक जुलै रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते होणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव मनीषा वर्मा, आदिवासी संशोधन संस्थेचे आयुक्त किरण कुलकर्णी या वेळी उपस्थित असतील.

माडिया भाषेला लिपी नाही. त्यामुळे तिचे लिखित दस्तऐवजीकरण झालेले नव्हते. त्यामुळे ही भाषा अस्तंगत होत चालली आहे. महाराष्ट्राला आणि जंगलाबाहेर पडल्याने स्वतःची भाषा विस्मरणात गेलेल्या माडियांच्या नव्या पिढीला या भाषेची ओळख व्हावी, या भागात शिक्षण देण्याचे काम करणाऱ्यांना आणि ही भाषा शिकू इच्छिणाऱ्या लोकांना उपयोग व्हावा या उद्देशाने डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकारी मैथिली देखणे-जोशी, ऋजुता टिळेकर आणि ख्रिस्तीन फरायरा यांनी या भागात जाऊन तिथल्या आदिवासी लोकांशी संवाद साधून अत्यंत कष्टाने माडिया भाषेतील हे पहिले पुस्तक निर्माण केले आहे. 

या पुस्तकातील सर्व उतारे, संवाद श्राव्य स्वरूपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे या भाषेतील शब्दांचे उच्चार समजून घेणे शक्य होणार आहे. त्याचा एक पेनड्राइव्ह पुस्तकासोबत देण्यात येणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 75 Days ago
This will remain -- a book for specialists studying languages , and historians . It deserves to preserved . Only libraries subsidised by public funds can afford to do this .
0
0
BDGramopadhye About 79 Days ago
I do not know how to express my admiration and respect for the effort . Hope , many libraries buy it . And linguists .
0
0
Manchuria p.Bapat About 79 Days ago
Manjiri tuze va tuzya teamche khup khup koutuk.Mala tuza khup abhiman vatato.
0
0
Sharmishtha kher About 80 Days ago
Great Work. Congratulation Dr. M. Paranhape !
0
0

Select Language
Share Link
 
Search