Next
मुलगी झाल्यास कल्याणमध्ये मोफत प्रसूती
डॉ. राजन वैद्य यांची मिनाताई ठाकरे कन्यारत्न स्वागत योजना
प्रेस रिलीज
Friday, June 14, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही चळवळ कल्याणमध्ये खऱ्या अर्थाने रुजत असून, कल्याणच्या डॉ. राजन वैद्य यांच्या व्यंकटेश रुग्णालयात यापुढे स्त्री अर्भकाचा जन्म झाल्यास डिलेव्हरी किंवा सिझेरियन मोफत केले जाणार आहे. त्यामुळे ‘मुलगी झाली, चिंता मिटली’ अशी परिस्थिती आता निर्माण होणार आहे.

मुलींचा जन्मदर कमी होत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू  असताना कल्याणमधील ख्यातनाम डॉ. वैद्य यांनी पुढाकार घेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चळवळीला मूर्त रूप दिले आहे. त्यांच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींच्या मातांची मोफत प्रसूती केली जाणार आहे. स्वर्गीय मिनाताई ठाकरे स्वागत योजनेचा शुभारंभ १४ जून २०१९ झाला. 

डॉ. वैद्य यांच्या पुढाकाराने कन्यारत्नाचे स्वागत तेही मिनाताई ठाकरे स्वागत योजना या नावाने केले जाणार असून, स्त्री अर्भकाचा जन्म झाल्यास डिलेव्हरी किंवा सिझेरियनचा कोणताही खर्च घेतला जाणार नाही. तीन ते पाच दिवस रुग्णालय व नर्सिंग सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. रुग्णाला औषधे व अन्य खर्च करावा लागणार आहे. ही योजना फक्त जनरल वॉर्डसाठी राखीव असून, त्यासाठी उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचे नाही. अशा प्रकारची योजना महाराष्ट्रात अंमलात आणली जात आहे.

डॉ. वैद्य हे स्वत: निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले असून, त्यांची दोन्ही मुले अमेरिकेतील नावाजलेल्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर म्हणून काम करीत आहेत. गेली ३० वर्षे वैद्यकिय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करीत असताना डॉ. वैद्य यांनी टेस्ट ट्युब बेबी सारखी खर्चिक उपचारपद्धती मुंबई महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात अतिशय माफक दरात पाच वर्षापूर्वी सुरू केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search