Next
महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस कॉन्क्लेव्ह
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 12:56 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘स्मॉल फार्मर्स ॲग्रिबिझनेस कन्सोर्शियम’तर्फे (एसएफएसी) पुण्यात ‘महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस कॉन्क्लेव्ह’ (एमएसी) या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या शेतकरी उत्पादक संघटनांना बळ देणे आणि तंत्रज्ञान, वित्तपुरवठा व कच्च्या मालाच्या पुरवठ्याद्वारे या संघटनांची क्षमता व शाश्वतता वाढवण्यासाठी अभिनव व प्रभावी व्यूहरचना शोधणे, हा या परिषदेचा हेतू होता.

परिषदेत कृषी व कंपनी अशा दोन्ही क्षेत्रांतील नामवंत सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भाषणांत या विभागातील शेतकऱ्यांना असलेल्या समस्या मांडल्याच, परंतु शेतकरी उत्पादक संघटना व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शाश्वतीचा प्रसार करण्यासाठीचे दुवे, महाराष्ट्रात कृषीव्यवसायांचा प्रसार करण्यासाठी ‘एसएफएसी’च्या ‘व्हेंच्युअर कॅपिटल असिस्टन्स’ व ‘क्रेडिट गॅरंटी स्किम’ यासारख्या योजनांच्या माध्यमातून कर्जांचे दुवे यासारख्या उपायांवरील आपल्या ज्ञानकौशल्याचीही देवाण-घेवाण केली.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रसारासाठी व शाश्वततेसाठी सरकारचे वरीष्ठ अधिकारी, कंपन्या, बँकेचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच शिक्षण तज्ज्ञ अशा सर्व सहयोगींनी या परिषदेत भाग घेतला. दोनशेहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या, शंभर कंपन्या व बँकांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादने सादर केली, तसेच कंपन्यांशी चर्चाही केली, ज्यातून कृषीमालाच्या बाजारपेठेशी जोडणीचा मार्ग तयार झाला.
परिषदेत ‘एसएफएसी’चे व्यवस्थापकीय संचालक सुमंत चौधरी व ‘बँक ऑफ बडोदा’चे ग्रामीण व कृषी बँकिंग आणि सीएसआर विभाग प्रमुख, तथा सरव्यवस्थापक बी. आर. पटेल यांनी शेतकरी उत्पादक संघटनांची सर्वांगीण वाढ व विकासासाठी एका सामंजस्य करारावर सह्या केल्या.

परिषदेचे उद्घाटन करताना चौधरी म्हणाले, “शेतकरी उत्पादक संघटनेचे ध्येय शेतकऱ्यांची स्पर्धात्मकता वाढवण्याचे, तसेच त्यांच्यासाठी उभरत्या बाजारपेठ संधींचा लाभ वाढवण्याचे आहे. आपल्याला शेती हा उद्योग अधिक शाश्वत व नफाक्षम बनवण्यासाठी अधिकाधिक सहयोगींना सहभागी करण्याच्या हेतूने ॲग्रिबिझनेस इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात शेतकरी उत्पादक संघटनांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आम्हाला शेतकऱ्यांना केवळ स्वयंपूर्ण बनवायचे नसून, समृद्धही करायचे आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, कंपन्या व बँका यांनी एसएफएसीच्या योजनांचा अधिकाधिक फायदा करुन घ्यावा.” 

पटेल म्हणाले, “आमच्या बँकेचे महाराष्ट्रात तीनशे २९ शाखांचे जाळे पसरले असून, बँक ऑफ बडोदाने एसएफएसीला तीन कोटी नऊ लाख रुपये साह्य देण्याची कटिबद्धता प्रकट केली आहे. शेतकरी उत्पादक संघटनांच्या प्रसारात आम्ही आघाडीची भूमिका बजावणार आहोत आणि त्यासाठीच आगामी काळात अधिक सहयोग करण्यावर भर देऊ. याच कारणासाठी आम्ही जागृती कार्यक्रमही सुरु केला आहे.”

‘महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उद्दिष्ट शेतकरी उत्पादक संघटनांचा बाजारपेठेशी संपर्कदुवा विकसित करण्याचे आहे. शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण कृषीमूल्य साखळीत सहभागी करुन घेऊन, शेती उद्योग नफाक्षम बनवण्याचा या परिषदेचा हेतू आहे.

पुण्यातील या परिषदेचे आयोजन ‘एसएफएसी’ने ‘ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ (अपेडा), ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज’ (एनआयआरडीपीआर), ‘पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ व ‘महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ (महा-एफपीसी) यांच्या सहकार्याने केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link