Next
हिमायतगर ‘ऑफ्रोट’च्या तालुकाध्यक्षपदी अशोक डवरे
नागेश शिंदे
Monday, May 06, 2019 | 12:28 PM
15 0 0
Share this article:


हिमायतगर : ‘ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल’च्या (ऑफ्रोट) हिमायतनगर शाखेची सभा डॉ. माधव भुर्के यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत ‘ऑफ्रोट’च्या हिमायतनगर तालुक्यासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी अशोक डवरे, उपाध्यक्षपदी संतोष डवरे, तर सचिवपदी डॉ. देविदास गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

या सभेत हिमायतनगर शाखा स्थापनेपासून आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संघटनेचा विस्तार व्हावा या उद्देशाने काही नवीन पदांना मंजुरी देऊन त्यांच्यावर जबाबदारी वाटून देण्यात आली. यात प्रामुख्याने संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी डॉ. माधवजी भुर्के, तालुका सहसचिवपदी पी. आर. बुरकुले, कोषाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भडंगे, सह कोषाध्यक्षपदी यशवंतराव ढोले, तर तालुका संघटकाची जबाबदारी पंडित साबळे, रामदास डोखले, संजय वाळके, प्रा. फोले, आणि प्रमोद वाळके यांच्यावर सोपवण्यात आली.

अशोक डवरेनांदेड जिल्ह्यात संघटनेच्या कार्याचा विस्तार होऊन पुढील कार्याला गती मिळण्यासाठी तालुका प्रसिद्धीप्रमुखाची धुरा विनायक मेंडके (नगरसेवक) यांच्यावर सोपवण्यात आली. संघटनेचे सभासद म्हणून मनोजकुमार डवरे, बालाजी माझळकर, दत्ता फोले, दिगंबर वागतकर, श्री. वानोले (शि.वि.अ.) मारोती गवले, तसेच तालुक्यातील महिला आणि मुलींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला प्रतिनिधींची जबाबदारी महानंदा बुरकुले, सुलोचना पंढरीनाथ बुरकुले, सौ. गुहाडे (फोले) यांच्यावर सोपवण्यात आली.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील मूळ आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. डॉ. गायकवाड यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search