Next
‘आयटी स्किल्स’मध्ये दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रेस रिलीज
Monday, April 15, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:



पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या पी. ए. इनामदार इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अॅकॅडमीतर्फे आयटी स्किल्स परफॉर्मन्स मेगा शो आयोजित करण्यात आला होता. त्यात दोन हजार विद्यार्थ्यांनी इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कौशल्ये सादर केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी उद्घाटन केले.

या वेळी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, पी. ए.  इनामदार इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अॅकॅडमीच्या संचालक मुमताज सय्यद, रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला उपस्थित होते. ९२१ विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर हार्डवेअर, मोबाइल रिपेरिंग, रोबोटिक्स, टायपिंग, टॅली टॅक्सेशन, ग्राफिक्स, सायबर सिक्युरिटीविषयक कौशल्यांचे सादरीकरण केले. टॅब आणि एलसीडी स्क्रीनवरून अध्ययन सादरीकरणात ९५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



या विषयी बोलताना डॉ. इनामदार म्हणाले, ‘संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक प्रगतीच्या सर्व संधी शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून मिळाव्यात, यासाठी संस्था राज्यभर कार्यरत असून गरीब, मागास विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील प्रगतीची दारे उघडून देण्याचे काम याद्वारे होत आहे. रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जात आहे. शालेय अध्ययन-अध्यापन पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केले जात आहे.’

अॅकॅडमीच्या संचालक मुमताज सय्यद यांनी स्वागत केले. आझम कॅंपसच्या मैदानावर झालेल्या या मेगा शोला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search