Next
टी. एस. कल्याणरामन यांचा जागतिक काँग्रेसमध्ये सन्मान
प्रेस रिलीज
Thursday, February 21, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this story

कोची : भारतातील सर्वांत मोठ्या आणि विश्वासार्ह ज्वेलर्स ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी. एस, कल्याणरामन यांचा कोची येथे झालेल्या ४४व्या आयआयए जागतिक काँग्रेसमध्ये खास पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कल्याणरामन यांनी कल्याण ज्वेलर्सचे केरळ येथील स्थानिक ब्रँडचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँडमध्ये रूपांतर करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेने हा पुरस्कार दिला आहे. बॉलिवूड सुपरस्टार आणि कल्याण ज्वेलर्सचे राष्ट्रीय ब्रँड अम्बेसिडर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या बद्दल कल्याणरामन म्हणाले, ‘मार्केटिंग कम्युनिकेशन क्षेत्रातील कल्याण ज्वेलर्सच्या असामान्यतेची दखल घेणारा हा पुरस्कार मिळणे सन्माननीय आहे. मी हा पुरस्कार आमच्या ग्राहकांना समर्पित करतो, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आज आम्ही जिथे आहोत, तिथे पोहोचू शकलो नसते. केरळमधील एक दुकान ते भारताच्या इतर राज्यांत, तसेच परदेशातील दालनांद्वारे स्थानिक ब्रँडचे जागतिक ब्रँडमध्ये झालेले आमचे रूपांतर केवळ विश्वासाच्या मूल्यावर आधरित आहे आणि ग्राहकांनाही आमची हीच विश्वासार्हता आपलीशी वाटली.’

‘सातत्यपूर्ण संदेशाद्वारे ब्रँड कम्युनिकेशनने कायमच प्रत्येक प्रदेशातील ग्राहकावर, त्यांची आवड आणि स्थानिक संस्कृतीशी निगडीत निवडी यांवर भर दिला. माझ्या मते, याच दृष्टीकोनामुळे आम्ही आपल्या देशात तसेच परदेशातील बाजारपेठेत यशस्वी झालो,’ असेही त्यांनी नमूद केले.

हा पुरस्कार प्रत्येक प्रदेशातील ग्राहकांसाठी खास तयार केल्या जाणाऱ्या जाहिरातींमागे असलेल्या ब्रँडच्या स्थानिकतेवर भर देणाऱ्या दृष्टीकोनाची दखल घेणारा आहे. प्रत्येक राज्याच्या ब्रँड अम्बेसिडरमुळे ब्रँडला ग्राहकांच्या आणखी जवळ घेऊन जाणे आणि त्यांच्याशी नाते जोडणे जास्त यशस्वी ठरले आहे.

हा पुरस्कार ब्रँडने सर्व प्रकारच्या कम्युनिकेशनच्या बाबतीत तसेच दालनांच्या बाबतीत जिथे पॅन भारत स्तरावर उप ब्रँड्स आणि तो प्रदेश व स्थानिक ग्राहकांच्या लग्न, सणासंदर्भातल्या विशेष आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले दागिने उपलब्ध करण्याच्या स्थानिक दृष्टीकोनाची दखल घेणारा आहे. दालनातील कर्मचारी वर्ग स्थानिक भाषेत पारंगत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेच्या गरजा त्यांना चांगल्या प्रकारे समजतात.

सध्याच्या घडीला कल्याण ज्वेलर्स दागिने क्षेत्रातील आघाडीच्या ब्रँड्सपैकी एक असून, ब्रँडने नुकतीच भारतात २५ वर्ष पूर्ण केली. १९९३मध्ये एका दालनासह झालेली ब्रँडची सुरुवात आता भारतासह युएईमधील जीसीसी (गल्फ कोऑपरेशन कौन्सिल), कतार, ओमान आणि कुवेतसह १३६ दालनांपर्यंत पोहोचली आहे. ब्रँड ‘कँडेर’सह दागिने संकेतस्थळासह ऑनलाइन विश्वात कार्यरत आहे. कल्याण ज्वेलर्सने सचोटी, विश्वास, दर्जा, पारदर्शकता आणि नाविन्य यांवर भर देणाऱ्या ग्राहकाभिमुख वृत्तीसह या क्षेत्रात मापदंड प्रस्थापित केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link