Next
कात्रजमधील पहिल्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 06:25 PM
15 0 0
Share this story

साई स्नेह हॉस्पिटलच्या डायलिसिस सेंटरचे उदघाटन करताना डॉ. शिवाजी पवार, गणेश राख, डॉ. सुनील जगताप आणि नगरसेवक वसंत मोरे

पुणे : कात्रजमधील साई स्नेह हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटर  सुरू करण्यात आले आहे. त्याचे  उद्घाटन स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ.  शिवाजीराव पवार  यांच्या हस्ते आणि डॉ. गणेश राख यांच्या उपस्थितीत  गुरुवारी, २६ एप्रिल रोजी झाले. कात्रज परिसरातील  हे पहिलेच सुसज्ज डायलिसिस सेंटर आहे.

या वेळी  नगरसेवक वसंत मोरे, नगरसेविका अमृता बाबर, नगरसेविका मनीषा कदम, राजाभाऊ कदम, नाना जगताप, डॉ. संभाजी कारंडे उपस्थित होते. वैदेही देवळेकर यांनी स्वागत केले. हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुनील जगताप यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. शिवाजी पवार म्हणाले, ‘शरीराची रक्त शुद्धीकरणाची यंत्रणा बिघडली की, पूर्ण जीवन उध्वस्त झाल्याची भावना निर्माण होते. डायलिसिसचे उपचार अशा रुग्णांना वरदान ठरतात. ही महत्वाची सुविधा कात्रज भागात उपलब्ध झाली, त्याचा उपयोग रुग्णांना होईल.

डॉ. गणेश राख म्हणाले, ‘बदलत्या जीवनशैलीमुळे, आहारातील बदल, प्रदूषण, हार्मोनमधील बदल, मधुमेह अशा अनेक कारणाने मूत्रपिंडावर (किडनी) ताण पडतो. ते नादुरुस्त झाले की, डायलिसीस प्रक्रियेद्वारे रक्त शुध्द करणे, हा एकमेव पर्याय राहतो. अशा रुग्णांना डायलिसिस सेंटर हाच आधार असतो.

‘साई स्नेह हॉस्पिटल’ने उपचार सुविधांमधील प्रत्येक आधुनिक गोष्ट उपलब्ध केली आहे,’ अशा शब्दात नगरसेवक वसंत मोरे यांनी गौरव केला.

‘साई स्नेह हॉस्पिटल’चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुनील जगताप, संचालक डॉ. सुमीत जगताप यांनी स्वागत केले. राजकुमार क्षीरसागर यांनी आभार मानले. साईप्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link