Next
बोधचिन्ह मिळालेल्या पोलिसांचा सत्कार
BOI
Friday, May 04 | 04:20 PM
15 0 0
Share this story



सोलापूर : उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदकप्राप्त २६ पोलिस कर्मचार्‍यांचा पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उल्लेखनीय सेवेबद्दल शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस महासंचालक पदकप्राप्त २६जणांना महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री विजयकुमार देशमुख व पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते महासंचालक बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आयुक्तालयातर्फे त्या कर्मचार्‍यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

या वेळी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) विमल तांबडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले व शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सत्कार केलेल्यांमध्ये सहायक फौजदार सतीश धामणसकर, नागय्या स्वामी, अंबादास राठोड, प्रदीप कुलकर्णी, महादेव सावंत, पोलीस हवालदार झाकिरहुसेन शेख, जयंत चवरे, माधव धायगुडे, जयकुमार चव्हाण, शांताराम वाघमारे, संजय पवार, तानाजी दोडकुले, राजकुमार तोळनुरे, सीमा डोंगरीतोट, पोलीस नाईक आप्पासाहेब पवार, मोहन गवळी, पोलीस हवालदार जहागिरदार, सतीश भोईटे, राजू ओहोळ, विश्‍वास भिटे, अनिल जाधव, नागनाथ फुटाणे, पोलीस नाईक संतोष कुलकर्णी व रवींद्र परबत यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link