Next
‘खुल्या प्रवर्गातील गरीब तरुणांसाठीही संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करा’
आमदार हेमंत टकले यांची मागणी
प्रेस रिलीज
Tuesday, July 02, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी आणि एसबीसी  प्रवर्गातील युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक नवीन स्वायत्त संस्था निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याच धर्तीवर खुल्या प्रवर्गातील गरीब तरुणांसाठीही नवीन स्वायत्त संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करावी’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी आज (दोन जुलै) केली. 

ज्या पद्धतीने मराठा समाजातील तरुणांसाठी ‘सारथी’ आणि एससी प्रवर्गासाठी ‘बार्टी’ या स्वायत्त संस्था कार्यरत आहे. त्याच धर्तीवर एक नवीन स्वायत्त संस्था निर्माण केली जाणार असून, ही संस्था ओबीसी, व्हिजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवणार आहे. गठित केलेली समिती एक महिन्यात अहवाल सादर करणार असून, त्याची घोषणा आज मंत्री संजय कुटे यांनी केली.

या घोषणेचे स्वागत करताना आमदार टकले यांनी त्याच धर्तीवर खुल्या प्रवर्गातील गरीब तरुणांसाठीही संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची मागणी केली. त्यावर सरकारने निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search