Next
तीन लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा
प्रेस रिलीज
Wednesday, April 10, 2019 | 01:30 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटोमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तीन लाख नऊ हजार २३३ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहेत.

राज्यात अंध, अल्पदृष्टी असलेले ५१ हजार ६०५ मतदार, ३५ हजार ८८७ मूकबधिर मतदार, अस्थिव्यंग असलेले एक लाख ६१ हजार ९२० मतदार आणि अपंग म्हणून नावनोंदणी केलेले ५९ हजार ८२१ मतदार आहेत. अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर आणि स्वयंसेवकांची सोय करण्यात आली आहे. अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकाऱ्यास नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी ईव्हीएम यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने ‘सुलभ निवडणुका’ (Accessible Elections) हे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, तसेच इतर अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे.

मतदार मदत केंद्राची व्यवस्था, मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा, मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक, विकलांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर ये-जा करण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा, निवडक शाळांमध्ये विकलांग मतदारांसाठी सहाय्यकारी मतदान केंद्र, अंध मतदारांसाठी ब्रेल भाषेमध्ये मतदार ओळखपत्र या सोयी-सुविधा मतदान केंद्रांमध्ये देण्यात येणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search