Next
भारताच्या भविष्यातील आर्थिक स्थितीवर नामवंतांकडून मंथन
प्रेस रिलीज
Tuesday, June 19 | 05:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएई) या मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि अर्थशास्त्र अभ्यासक्रमातील भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थेद्वारे अलीकडेच आयोजित ‘बाजाराच्या वाढत्या संकटाचा सामना भारत कसा करेल’ या विषयावरील चर्चासत्रात नामवंत तज्ज्ञांकडून भारताच्या भविष्यातील आर्थिक स्थितीवर विचार मंथन करण्यात आले.

जगभरातील उदयोन्मुख बाजारांतील अलीकडच्या घडामोडींबद्दल आणि विविध आर्थिक आव्हानांचादेखील या वेळी विचार करण्यात आला. भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेत असलेल्या सध्य आर्थिक अनिश्चिततेशी निगडीत अनेक मुद्द्यांवर आणि परिबळांवर चर्चा करण्यासाठी अॅम्बिट कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ मुखर्जी, आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ अजित रानडे, ‘मिंट’चे कार्यकारी संपादक निरंजन राजाध्यक्ष आणि ‘एमडीएई’चे प्राध्यापक इंद्रदीप घोष सहभागी आदी मान्यवर तज्ज्ञ या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

भारतासारख्या बाजारपेठांना प्रभावित करणारी परिबळे या चर्चेतून शोधण्यात आली, जशी की ट्रम्प प्रशासनाने केलेले बदल, रुपयाचे अवमूल्यन, बदलते यूएस व्याजदर आणि भारतीय आर्थिक असंतुलन. वर्तमान आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी फायनान्शियल टाइम्समधील संपादकीय लेखातून फेडरल रिझर्व बँकेस नुकतीच केलेली विनंती, ट्रम्प प्रशासनाच्या कर कपातीचे परिणाम, चालू खात्यातील वाढत्या तुटीची कारणे, जगभरातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारताचे आर्थिक स्थान या विषयांवर मान्यवरांनी विस्तृत चर्चा केली.

या चर्चेबाबत टिप्पणी करताना ‘एमडीएई’चे प्राध्यापक इंद्रदीप घोष म्हणाले, ‘या चर्चासत्रात अशा विविध मुद्द्यांवर आणि परिबळांवर चर्चा करण्यात आली ज्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सरळ परिणाम होत आहे व त्यांचा सामना करण्याची गरज आहे. मला आशा आहे की, या चर्चसत्राचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांनाच नाही, तर व्यावसायिकांना, धोरणे तयार करणाऱ्यांना आणि या उद्योगातील ज्येष्ठांना देखील नवीन बाबी जाणून घेण्यासाठी आणि देशात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी होईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link