Next
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव
मिलिंद जाधव
Tuesday, September 18, 2018 | 12:41 PM
15 0 0
Share this storyनवी मुंबई :
कला, सामाजिक कार्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना नवी मुंबईतील तपस्या कला फाउंडेशनतर्फे नुकतेच सन्मानित करण्यात आले.

या वेळी तपस्या कला फाउंडेशनच्या ६५ विद्यार्थिनींनी नाट्यरंग सांस्कृतिक सादरीकरण केले. ऋषी तालमणी पंडित ब्रिजराज मिश्र या गुरूंना मानवंदना देण्यासाठी तपस्या कला फाउंडेशनच्या संस्थापिका व कथक नर्तिका नीला दामले यांच्या वतीने नेरुळमधील आगरी, कोळी संस्कृती भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना कथक राणी जयंती माला मिश्रा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तपस्या कला फाउंडेशन काम करते. फाउंडेशनच्या वतीने अदिती पंडित, स्वाती भसे, अपूर्व दामले या वरिष्ठ शिष्यांनी या कार्यक्रमाच्या नृत्यासाठी ६५ शिष्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विजय म्हात्रे (लोकनृत्य नृत्यदिग्दर्शक), रामनाथ म्हात्रे (लोककला), तुषार चटर्जी (शास्त्रीय कलाकार), रंजना चटर्जी (शास्त्रीय गायन), प्रशांत कदम (शास्त्रीय संगीत), सुहास ठाकूर (पखवाज वादक), संभाजी श्यामला (सतार वादक), कामोद कहेत (हार्मोनियम तज्ज्ञ), योगेश चिकटगावकर (लोककलावंत), हेमाली शेडगे (लोककला नृत्य प्रशिक्षक), अमोल शिंदे (सामाजिक क्षेत्र), तुषार शिरसाठ (तरुण लोककलावंत), अमित शिंदे (तरुण लोककलावंत), सेन्हा गायकवाड (तरुण लोककलावंत), नरेंद्र दीक्षित (तरुण लोक कलावंत), शुभम सावंत (तरुण लोककलावंत), गोविंद माल्शिनीकर (तरुण लोककलावंत), श्रेयस दामले (तबलावादक) अपूर्वा दामले (कथक नर्तिका) या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

‘आमच्या कार्याचा सन्मान केल्यामुळे व पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे आम्हाला काम करण्यास अजून स्फूर्ती मिळाली आहे,’ अशी प्रातिनिधिक भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link