Next
‘ब्रेन ओ ब्रेन फेस्ट’ स्पर्धेचे १३ जानेवारीला आयोजन
अॅबॅकसचा प्रचार करणाऱ्या या स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 12:13 PM
15 0 0
Share this article:

चिंचवड : ‘ब्रेन ओ ब्रेन संस्थेतर्फे राज्यस्तरीय ‘ब्रेन ओ ब्रेन फेस्ट’ ही स्पर्धा १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित केली असून, यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अॅबॅकसचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे,’ अशी माहिती ‘ब्रेन ओ ब्रेन’च्या रचना बागडीया व स्मिता जाधव यांनी दिली.

‘ब्रेन ओ ब्रेन’ ही चार ते १४ या वयोगटांतील मुलांचा अॅबॅकसच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करणारी संस्था असून, ती पुणे व पिंपरी-चिंचवड भागात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. गेल्या १५ वर्षांपासून जागतिक व राष्ट्रीय स्तरावर लहान मुलांच्या शिक्षणासाठी व प्रशिक्षणासाठी ही संस्था काम करत आहे. दर वर्षी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाते.

या विषयी अधिक माहिती देताना जाधव म्हणाल्या, ‘स्पर्धेमध्ये प्रत्येक वयोगटासाठी स्पर्धेचा कालावधी हा तीन मिनिटांचा राहणार आहे. या तीन मिनिटांच्या कालावधीमध्ये सर्वांत जास्त प्रश्नांची उत्तरे सोडविणारा विद्यार्थी त्या गटाचा विजेता ठरणार आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांच्याशी संबंधित प्रश्न यात असणार आहेत.’

अॅबॅकस स्पर्धेमुळे मुलांमध्ये गणित विषयाबाबत गोडी निर्माण होण्यास मदत होते. अॅबॅकसच्या माध्यमातून मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास निश्चित मदत होते, त्यामुळेच अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये चार ते चौदा वर्षांखालील मुलांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेविषयी :
दिवस :
रविवार, १३ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी पाच
स्थळ : अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search