Next
गांधी जयंतीनिमित्त हिमायतनगरमध्ये स्वच्छतेची शपथ
नागेश शिंदे
Tuesday, October 02, 2018 | 03:30 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
शहराच्या नगरपंचायत कार्यालयात दोन ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.



‘स्वच्छता हीच सेवा असून, स्वच्छता हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जीवन जगताना स्वच्छतेतून समृद्धीकडे या तत्त्वाप्रमाणे जगल्यास मानवाला निश्चितच सुख, समाधान, शांती मिळते,’ अशी शपथ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी उपस्थितांना शपथ दिली. ‘आम्ही आमचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवू व दुसऱ्यांनाही सांगू. आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता आम्ही होऊ देणार नाही. शहर स्वच्छ ठेवू,’ अशी शपथ या वेळी घेण्यात आली.



या वेळी नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष मो. जावेद भाई, अन्वर खान पठाण, सदाशिव सातव, गुफरान भाई, सावन डाके, विनायक मेंडके आदी नगरसेवक, विद्यार्थी व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search