Next
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ व ‘ऑरोव्हिले’ यांचा सहयोग
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this story

‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि ‘ऑरोव्हिले’ यांच्यातील कराराप्रसंगी ‘महिंद्रा’चे महेश बाबू आणि ‘ऑरोव्हिले’चे मिनहाज अमीनपुदुच्चेरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा इलेक्ट्रिक या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने समाजासाठी भारतातील पहिल्या एकात्मिक शाश्वत मोबिलिटी इकोसिस्टीमचा प्रयोग करण्यासाठी ‘ऑरोव्हिले’ या तामिळनाडूत स्थापन करण्यात आलेल्या प्रायोगिक टाउनशिपबरोबर परस्पर सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या विशेष सुविधेमुळे, ‘ऑरोव्हिले’च्या गेल्या काही दशकांतील अनेक ई-मोबिलिटी उपक्रमांचा विस्तार होणार आहे. या सुविधा शांत वाहतूक, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर व कार्बनमध्ये घट, हॉप-ऑन हॉप-ऑफ शटल्स व स्मार्ट पार्किंग यातील उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध करण्याच्या प्रयत्नाला अनुसरून असणार आहेत.

या ‘एमओयू’अंतर्गत, दोन्ही पक्ष ‘महिंद्रा’ची इलेक्ट्रिक वाहने, स्मार्ट पार्किंग सिस्टीम्स, चार्जिंग सुविधा व नेमो ही सॉफ्टवेअर एकात्मिककरण सुविधा यांचा समावेश असलेली सर्वांगीण इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी आयआयसी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), पुदुच्चेरी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड व गोग्रीन बीओव्ही व ऑरोव्हिलेमधील अनेक उपक्रमांबरोबर काम करणार आहेत. राइड शेअरिंग, राइड हेलिंग, सेल्फ-ड्राइव्ह रेंटल्स अशी मोबिलिटी मॉडेल तयार करण्याचेही उद्दिष्ट आहे. फ्रेंच सरकारचा पाठिंबा असलेले, पीएससीडीएल हे शहर नियोजक या उपक्रमात मोलाचे योगदान देणार आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिकने ऊर्जा साठवण्याच्या उपयाचेही अनावरण केले असून, त्यामुळे चार्जिंग सुविधा, ईव्ही पार्किंग, ईव्ही सपोर्ट सेंटर अशा सुविधा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जेमध्ये वाढ करण्याबरोबरच एंड-टू-एंड ग्रीन सोल्यूशन ठरण्यासाठीही मोठी मदत होईल.

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले की, ‘जागतिक पर्यावरण दिनी ‘महिंद्रा’ला समाजासाठी एकात्मिक शाश्वत मोबिलिटी सुविधा निर्माण करण्यासाठी ऑरोव्हिले, आयआयएस व अन्य भागीदारांशी सहयोग करताना आनंद होत आहे. भारतात इलेक्ट्रिक सुविधा निर्माण करण्यासाठी ‘महिंद्रा’ दशकभर कार्यरत आहे. संपूर्ण समुदायासाठी मोबिलिटी, ऊर्जेची साठवणूक व चार्जिंग यासाठी सामायिक व्यासपीठ तयार करणे, हे भविष्यात विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रीन मोबिलिटी सिस्टीमची निर्मिती करण्याचे ‘ऑरोव्हिले’चे उद्दिष्ट व ईव्ही तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी अधिकाधिक लोकांना मदत करण्यासाठीचा आमचा उपक्रम यांच्यामध्ये कमालीचा सहयोग आहे. कोणत्याही समुदायासाठी शाश्वत मोबिलिटी सुविधा विकसित करण्यासाठी महिंद्रा इलेक्ट्रिकचे नेमो हे सर्वात साजेसे व्यासपीठ ठरणार आहे, याची आम्हाला खात्री आहे.’

‘ऑरोव्हिले’च्या एकात्मिक ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसचे समन्वयक मिनहाज अमीन म्हणाले, ‘समाजासाठी सार्वजनिक व खासगी वाहतुकीसाठी पर्याय निर्माण करण्यासाठी दोन दशके प्रयोग केल्यानंतर, ‘ऑरोव्हिले’च्या मते तंत्रज्ञानातील नाविन्य व महिंद्रा इलेक्ट्रिक, आयआयएससी व गो ग्रीन अशा भागीदारांचा पाठिंबा यामुळे ‘ऑरोव्हिले’ला एंड-टू-एंड शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्सची प्रतिकृती करण्यासाठी मदत होणार आहे व त्याचे अनुकरण अन्य शहरांतही करता येणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link