Next
बजाज अलियान्झचा एनकेजीएसबी बँकेशी करार
प्रेस रिलीज
Friday, December 22 | 05:20 PM
15 0 0
Share this story

पुणे :  भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ कंपनीने एनकेजीएसबी सहकारी बँकेशी कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. एनकेजीएसबी बँकेची बँकिंग क्षेत्रात शंभर वर्ष पूर्ण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार केला आहे.

या तीन वर्ष कराराअंतर्गत एनकेजीएसबी बँक बजाज अलियान्झ जीवन विमा कंपनीच्या सर्व उत्पादनांचे बँकेच्या सहा लाखांपेक्षा जास्त ग्राहकवर्गाला वितरण करणार आहे. या उत्पादनांमध्ये युनिट लिंक्ड जीवन विमा योजना, संरक्षण आणि बचत योजना, एंडोमेंट आणि निवृत्ती योजना यांचा समावेश आहे. सध्या बँकेच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत १०६ शाखा कार्यरत आहेत.

एनकेजीएसबी सहकारी बँक आणि बजाज अलियान्झ जीवन विमा कंपनीमध्ये झालेल्या या करारावर बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात सह्या करण्यात आल्या. यावेळेस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक चिंतामण नाडकर्णी, आणि उप व्यवस्थापकीय संचालक पी. जी. कामथ तसेच बजाज अलियान्झ जीवन विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याबाबत बजाज अलियान्झच्या जीवन विमा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चौघ  म्हणाले, ‘एनकेजीएसबी कॉर्पोरेट एंजट भागिदाराच्या रूपात मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद असून त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत असलेला बँकेचा ग्राहकवर्ग आणि वितरण जाळ्याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल. या कराराद्वारे वर नमूद केलेल्या राज्यांत राहाणाऱ्या ग्राहकांना आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गरजेवर आधारित विमा उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू आहे.’

यावेळी एनकेजीएसबी बँकेचे अध्यक्ष किशोर कुलकर्णी  म्हणाले, ‘बजाज अलियान्झ जीवन विमा कंपनीबरोबर झालेल्या या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना त्यांच्या जीवनातील विविध उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तसेच संरक्षण आणि संपत्ती निर्मितीसाठी विमा उत्पादने उपलब्ध होतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link