Next
‘आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनामध्ये मराठी समुदायाने हिरीरीने भाग घ्यावा’
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this story

युरोपिअन मराठी संमेलनाचे निमंत्रण पत्र  'सिनर्जी हॉलिडे व्हिलेज च्या संचालकांना देताना हेमंत रायकर. या वेळी मंदार देवगावकर ,राजेंद्र आवटे ,गणेश जाधव ,मकरंद केळकर उपस्थित होते.

पुणे : ‘आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनाच्यानिमित्ताने मराठी कला, संस्कृती, सामूहिक कर्तृत्वाचा परिचय घडून येत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या मराठी संमेलनांमध्ये मराठी समुदायाने हिरीरीने भाग घ्यावा’, असे आवाहन ‘श्री दीपलक्ष्मी’ इंटरनॅशनल विशेषांकाचे संपादक आणि आगामी युरोपीय मराठी संमेलन संयोजन मंडळाचे प्रतिनिधी हेमंत रायकर यांनी केले.

‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, ‘सिनर्जी फाउंडेशन’ आयोजित ‘सिनर्जी संवाद’ उपक्रमात पाहुणे या नात्याने ते बोलत होते. या वेळी ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ हे ‘न्यू कॅसल (इंग्लंड) येथे होणाऱ्या युरोपियन मराठी संमेलनाचे सहप्रायोजकत्व स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रकाशन क्षेत्रातील ‘श्री दीपलक्ष्मी’ च्या ७२ वर्षाच्या योगदानानिमित्त  आणि ११ आंतरराष्ट्रीय संमेलनांना उपस्थित राहणाऱ्या हेमंत रायकर यांचा सत्कार ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ च्या वतीने करण्यात आला. युरोपियन मराठी संमेलनाचे निमंत्रण पत्र हेमंत रायकर यांनी ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव यांना सुपूर्द केले. मकरंद केळकर या वेळी उपस्थित होते. या वेळचे  द्वैवार्षिक युरोपीय मराठी संमेलन २९ जून ते एक जुलै २०१८ दरम्यान ‘न्यू कॅसल’ (इंग्लंड) येथे होणार आहे. 

या वेळी हेमंत रायकर यांनी दोन दशकातील आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक शिस्तबद्ध संमेलने होतात. तेथील मराठी बांधव वेळात-वेळ काढून संमेलनाची जबाबदारी घेतात, यशस्वी करून दाखवतात. या निमित्ताने मराठी संस्कृतीचा गजर आंतरराष्ट्रीय पातळीवर होतो. महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठी बांधवांमध्ये संवादाचे पूल बांधले जातात. पुस्तकांची विक्री होते . लेखक ,कलाकारांच्या भेटी होतात. त्यामुळे मराठी समुदायाने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये हिरीरीने भाग घेतला पाहिजे.’ 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक बीडकर यांनी केले, तर राजेंद्र आवटे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link