Next
मतदार जागृती परिषदेतर्फे पुण्यात सभा
प्रेस रिलीज
Saturday, February 16, 2019 | 01:39 PM
15 0 0
Share this article:



पुणे : मतदार जागृती परिषद यांच्या वतीने मतदार जागृतीसाठी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. युवक क्रांती दलाचे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावर चर्चा करण्यासाठी स्वामी अग्निवेश, तिस्ता सेटलवाड, निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, निरंजन टकले, यशवंत मनोहर, डॉ. श्रीपाल सबनीस सहभागी होणार आहेत.

मतदार जागृती परिषदेच्या आगामी उपक्रमांची माहिती देण्यासाठी १५ फेब्रुवारीला डॉ. सप्तर्षी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन श्रमिक पत्रकार संघात केले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. युवा क्रांती दलाचे संघटक संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर दलाच्या पुणे शहराध्यक्ष मयुरी शिंदे, मतदार जागृती परिषदेचे प्रशांत कोठडीया हे या वेळी उपस्थित होते. या सभेत अनेक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक सहभागी होणार आहेत.

राजकीय पक्षांबाहेरील परिघांमध्ये ही परिषद कार्यरत राहणार असून, पुढेही पुण्यात आणि राज्यभरात सभा आयोजित केल्या जाणार आहेत. पहिली सभा २० जानेवारीला एस. एम. जोशी फाउंडेशन येथे झाली होती. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी, सुरेश खोपडे, डॉ. विश्वम्भर चौधरी, श्रीरंजन आवटे, प्रशांत कोठडीया, मौलाना निजामुद्दीन सहभागी झाले होते. सात फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या सभेत पत्रकार निरंजन टकले, आरोग्यसेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य, युवा लेखक श्रीरंजन आवटे, प्रशांत कोठडीया जांबुवंत मनोहर, मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक सर्फराज अहमद हे वक्ते सहभागी झाले होते.

सभेविषयी :
दिवस :
रविवार, १७ फेब्रुवारी २०१९
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search