Next
पुण्यात २६ जुलैला ‘गान-रस-रंग’ कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, July 25, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गान-रस-रंग’ हा कार्यक्रम शुक्रवार, २६ जुलैला सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

‘वृष स्वर’प्रस्तुत या कार्यक्रमात गायक अभिजित वाडेकर आणि गायिका वृषाली मावळंकर हे उपशास्त्रीय संगीत, अभंगापासून गझल, लावणी, कव्वाली अशा विविध रचना सादर करणार आहेत. त्यांना प्रसन्न बाम (हार्मोनियम), अभय गाडगीळ (की-बोर्ड ), समीर बंकापूरे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य) हे कलाकार साथसंगत करणार असून, रंजना काळे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८० वा कार्यक्रम असून, तो सर्वांसाठी विनामूल्य आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search