Next
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
BOI
Monday, February 04, 2019 | 05:32 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी : चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशाला, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांमधील माजी विद्यार्थी असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.

वरद चंद्रशेखर पटवर्धन, प्रथमेश सुहास बाम, सिद्धांत मनोहर सुराणा, प्रसाद गोविंद मुळे आणि धनंजय किशोर गानू या पाच विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या वेळी सोसायटीचे पदाधिकारी रमेश कीर, आनंद देसाई, मनोज पाटणकर, ‘गोगटे-जोगळेकर’चे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, शिर्के प्रशालेचे रमेश चव्हाण, तसेच या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.    

नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही परीक्षा देण्यात आली. ‘आयसीएआय’ रत्नागिरी केंद्राच्या वतीने नोव्हेंबर २०१८ मध्ये या परीक्षा ‘गोगटे-जोगळेकर’मध्ये झाल्या. या केंद्रात या परीक्षेसाठी ५४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील पाच माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

याशिवाय ‘आयसीएआय’ तर्फे सीपीटी सीए फाउंडेशन, आयपीसीसी याही परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षांना मिळून १००हून अधिक विद्यार्थी ‘गोगटे-जोगळेकर’ महाविद्यालयाच्या केंद्रातून प्रविष्ठ झाले. सीपीटी सीए फाउंडेशन या परीक्षेत महाविद्यालयाच्या सोनाली सुहास मुळे, कस्तुरी उदय पाटील, पूर्वा उदय जोगळेकर, श्रृती जयंत बापट, राधिका शुभंकर लोटकर या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांचेही सर्वांनी अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link