Next
‘नोकरदारांनी बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत करावे’
प्रेस रिलीज
Thursday, July 19 | 04:27 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘नोकरदारांनी आपल्या गुंतवणुकीचा प्लान तयार ठेवला पाहिजे. सेव्हिंगचे रूपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी केले.

सिनर्जी हॉलिडे व्हिलेज व सिनर्जी फाउंडेशन यांच्या वतीने ‘सिनर्जी संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम एरंडवणे येथील सिनर्जी सभागृहात १८ जुलै रोजी झाला. अर्थसाक्षरता विषयातील योगदानाबद्दल काकिर्डे यांचा ‘सिनर्जी हॉलिडे’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

काकिर्डे म्हणाले, ‘सध्याच्या काळात पगारात भागत नाही, मग बचत कशी करायची हा प्रश्न पडतो. बचत, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे. बँकेतील सेव्हिंगवर चार टक्क्यांहून अधिक पैसे व्याज म्हणून मिळत नाही. शिवाय त्या पैशाची पर्चेसिंग व्हॅल्यू कमी होते. सोन्यात कधीही गुंतवणूक करू नये. ती मृत गुंतवणूक ठरते. नोकरदारांनी आपल्या गुंतवणुकीचा प्लान तयार ठेवला पाहिजे. सेव्हिंगचे रूपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे.’

‘तरुण वयात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्सकडे आधी लक्ष द्यावे. शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नंतर लक्ष द्यावे. रिअल इस्टेट गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, म्हणून काळजीपूर्वक विचार करावा,’ असे काकिर्डे यांनी या वेळी सांगितले; तसेच इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही, तर आपत्कालिन व्यवस्था आहे, हे लक्षात घेऊन गुंतवणूक करताना जोडीदाराबरोबर सल्लामसलत केली पाहिजे, असा सल्लाही काकिर्डे यांनी दिला.

राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले. दीपक बीडकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link