Next
लक्षवेधी ठरतोय ‘भारत’मधील वयोवृद्ध सलमान
पहिले पोस्टर प्रकाशित; पाच जूनला होणार चित्रपट प्रदर्शित
BOI
Tuesday, April 16, 2019 | 06:21 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘जर्नी ऑफ अ मॅन अँड अ नेशन टुगेदर’ अशी टॅगलाईन असलेले सलमान खानच्या बहुचर्चित ‘भारत’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सलमानचा हा लूक लक्षवेधी ठरत आहे. अभिनेत्री कतरिना कैफदेखील या चित्रपटात असून ‘ईद’च्या मुहूर्तावर, पाच जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’मधले वयोवृद्ध लूकमधील सलमान खान असलेले हे पोस्टर सलमानने नुकतेच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. ‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढी मे हैं, उससे कई ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही है...’ अशा ओळी लिहून सलमानने हे पोस्टर प्रदर्शित केले आहे. चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफ हेदेखील दिसणार आहेत. 

दरम्यान २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारित ‘भारत’ या चित्रपटाची कथा असल्याचे म्हटले आहे. रशियन सर्कस आणि अन्य काही कोरियन दृश्ये भारतमध्ये पाहायला मिळणार आहेत. तब्बू, सुनील ग्रोवर, दिशा पटानी हे कलाकारदेखील भारतमध्ये पाहायला मिळणार आहेत. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search