Next
२४ वर्षांनंतर जितेंद्र-जयाप्रदा यांची जोडी दिसणार पुन्हा एकत्र
एका ‘टिव्ही शो’मध्ये विशेष अतिथी म्हणून लावणार हजेरी
BOI
Monday, February 18, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this story

अभिनेते जितेंद्र आणि जयाप्रदामुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ कलाकार आणि सुप्रसिद्ध जोडी अभिनेते जितेंद्र आणि अभिनेत्री जयाप्रदा हे तब्बल २४ वर्षांनंतर एका ‘टिव्ही शो’च्या माध्यमातून पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. २०पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेली ही जोडी पुन्हा एकत्र पाहता येणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. 

‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’वर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘सुपर डान्स – चॅप्टर ३’च्या विशेष भागात जितेंद्र आणि जयाप्रदा हे दोघे विशेष अतिथी म्हणून येणार आहेत. या भागात शो मधील स्पर्धक मुले या जोडीच्या १९८०-९०च्या दशकातील गाण्यांवर नृत्य सादर करणार आहेत. 

या कार्यक्रमाबाबत जयाप्रदा यांचे मत विचारले असता, ‘या शोमधल्या मुलांची नृत्यकला पाहून मी खूप उत्साहित झाले आहे. या मुलांच्या माध्यमातून नृत्य ही संकल्पना खूप छान प्रकारे विकसित होत आहे, हे पाहणे खूप आनंद देणारे आहे’, असे मत त्यांनी मांडले. अभिनेते जितेंद्र हेदेखील या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ‘माझा नातू लक्ष्य हादेखील इथल्या मुलांप्रमाणेच खूप चुणचुणीत असून तेवढाच उर्जावान आहे’, असे ते म्हणाले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link