Next
कुमार प्रॉपर्टीज ‘ग्रेटेस्ट ब्रँड इन रियल इस्टेट सेक्टर’
प्रेस रिलीज
Thursday, March 08 | 06:08 PM
15 0 0
Share this story

पुणे :  सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या इंडो-सिंगापूर बिझनेस आणि ‘एशियाज ग्रेटेस्ट ब्रँडस अँड लीडर्स’  सोहळ्यात पुण्यातील कुमार प्रॉपर्टीजच्या ‘प्रीव्ही रेसिडेन्सेस’ या ब्रँडला  ‘एशियाज ग्रेटेस्ट ब्रँडस इन रियल इस्टेट सेक्टर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या वेळी युक्रेनचे राजदूत आणि मंत्री, सिंगापुरमधील कझाकस्तान दूतावासाचे कॉन्सुलर फैझराखान कॅसेंनोव्ह आदी मान्यवर उपस्थित होते.   
 
‘कुमार प्रॉपर्टीज गेली ५० वर्षे भारतात रियल इस्टेट क्षेत्रात काम करत असून, ‘प्रीव्ही रेसिडेन्सेस’ हा ब्रँड कुमार प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक राजस विमलकुमार जैन,यांच्या नेतृत्वातून साकार झाला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणे ही आमच्यासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे’, असे कुमार प्रॉपर्टीजच्या  मार्केटींग विभागाच्या सहायक व्यवस्थापकीय संचालक वैशाखी फडके यांनी हा पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

‘आमच्या ५० वर्षाच्या अथक परिश्रमांना व समर्पणाला मिळालेली ही कौतुकाची थाप  आहे’, अशा शब्दात राजस जैन यांनी भावना व्यक्त केल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link