Next
‘चेतक महोत्सव’ जगातील मोठे आकर्षण ठरेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, December 27, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this storyनंदुरबार :
‘पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि मोठे आकर्षण ठरेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत आयोजित अश्व स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते २६ डिसेंबर २०१८ रोजी झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुवर रावल, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘हा महोत्सव म्हणजे घोड्यांचा ऐतिहासिक सोहळा आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. चांगल्या प्रसिद्धीमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे घोडे महोत्सवात येत आहेत. श्रीदत्ताच्या आशीर्वादाने महोत्सवाचा अधिक विस्तार होईल.

महोत्सवासाठी मुख्यमंत्री महोदयांचे सहकार्य असून शुभेच्छा देण्यासाठी ते सारंगखेडा येथे आले असे रावल यांनी सांगितले.तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महोत्सवासाठी अकोला येथून घोडेस्वारी करीत आलेल्या ११ वर्षांच्या राजवीरसिंह नागरा या बालकाचा या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, असे ‘महान्यूज’च्या बातमीत म्हटले आहे.

अश्व स्पर्धेचे उद्घाटन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अश्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी अश्व खेळ आणि अश्वनृत्याची पाहणी केली. यातील साहसी खेळांबाबत त्यांनी कौतुकोद्गार काढले. बचत गट प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली आणि महोत्सवातील कला प्रदर्शनालादेखील भेट दिली.

टेंट सिटीची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तापी नदीच्या तीरावर पर्यटकांसाठी वसवलेल्या टेंट सिटीचीही पाहणी केली. या राहुट्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेले रेस्टॉरंट, स्पा, एसी आणि नॉन इसी टेंट, दोन दरबारी टेंट, कॅरम, चेस आणि बिलियर्डस् यांसारख्या खेळांची सुविधादेखील पुरविण्यात आली आहे. दरबारी टेंटमधील सुविधा लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय पर्यटक महोत्सवाकडे आकर्षित होतील, असा  विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link