Next
२०व्या कारगिल दिनानिमित्त शहिदांना अभिवादन
BOI
Friday, July 26, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this article:


पुणे : कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी २६ जुलै या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. पुण्यातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल शिवदर्शन येथे ‘नमन त्यांच्या शौर्याला’ हा कार्यक्रमादरम्यान अमर जवान स्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, मेणबत्ती पेटवून, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

या प्रसंगी कारगिल युद्धात सहभागी झालेले कर्नल सुरेश पुरी व हवालदार मेजर सतीश शिंदे उपस्थित होते. या वेळी बोलताना कर्नल पुरी यांनी आम्हाला मरण आले, तरी पुढचा जन्म भारतातच मिळावा आणि भारत मातेचे रक्षण करण्याचे भाग्य लाभावे, असे सांगितले. 

मेजर शिंदे म्हणाले, ‘कारगिल युद्धात आम्ही २२ सहकारी रात्रभर कारगिल शिखर चढून पहाटे पोहचलो व दुष्मनांना यमसदनी पाठवून आपला तिरंगा या शिखरावर फडकावला हा क्षण आमच्यासाठी विस्मरणीय आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही देशासाठी प्राण हातावर घेऊन तयार आहोत.’ 

पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित आबा बागुल म्हणाले, ‘भारतीय सैनिक आपल्या जीवाची तमा न बाळगता सीमेवर खडा पहारा देतात. त्यामुळे आपण मोकळा श्वास घेतो. आपण सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसोबत विविध सण साजरे करावे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे.’ 

या वेळी नंदकुमार बानगुडे, घन:शाम सावंत, संतोष गेले, सागर आरोळे, संतोष पवार व नागरिक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search