Next
बाप्पाला निरोप देण्यासाठी पर्यावरणपूरक ‘व्होडाफोन इको-पाँड’
प्रेस रिलीज
Wednesday, September 12 | 04:19 PM
15 0 0
Share this story

पुणे : व्होडाफोन आयडिया कंपनीतर्फे याही वर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी ‘व्होडाफोन इको पाँड्स’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवात ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ या उपक्रमाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.  

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या ७५ लाखांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन दरवर्षी पुणे शहर व परिसरात होते. त्यातून विघटन न होणारा कित्येक टनांचा ढीग निर्माण होतो. गणेशोत्सवानंतर पुणे व परिसरातील नद्या, तलाव व इतर जलस्रोतांमध्ये पारा, कॅडमियम, शिसे या जड आणि आरोग्यास अत्यंत धोकादायक अशा धातूंचे प्रमाण शंभर पटींनी वाढते.

आपल्या परंपरेनुसार विसर्जन करतानाच हे प्रदूषण टाळण्याचेही उपाय पुणेकरांना हवे असतात, हे व्होडाफोन आयडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या सर्वेक्षणातील निरीक्षणांच्या अनुषंगाने ‘व्होडाफोन इको पाँड्स’ची संकल्पना राबवण्यात आली आहे. हे करताना पर्यावरणाच्या रक्षणाचे, तसेच गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्याचे आव्हान ‘व्होडाफोन’ने पेलले आहे. याकामी कंपनीला पुणे महापालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांचे सहकार्य लाभले आहे. २०१७मध्ये पुण्यातील ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ या हौदांमध्ये तीन हजार १०० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पुण्यातील ‘व्होडाफोन’च्या सात दुकानांच्या परिसरात यंदा कंपनीतर्फे ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ हे पाण्याचे तात्पुरते हौद उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी जीवरक्षकासह कर्मचारी तैनात केलेले असतील. १३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू झाल्याबरोबरच हे हौदही पुणेकरांसाठी उपलब्ध असतील. यातील कोणत्याही हौदामध्ये पुणेकरांना गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. तेथील कर्मचारी पुणेकरांना मदत करतील.

या सात हौदांव्यतिरिक्त, चार फिरते हौदही यंदा ‘व्होडाफोन आयडिया’तर्फे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना या फिरत्या हौदांचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. याचा विचार करून व्होडाफोन आयडिया कंपनीने सामाजिक जबाबदारीचे भान राखून ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ योजना राबविली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर कंपनीने १३ टन प्लास्टर ऑफ पॅरिसवर पुनर्प्रक्रिया केली आणि एक लाख लिटर इतके खत निर्माण केले. हे खत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटण्यात आले.

एनआयबीएम, वाकडेवाडी, औंध, खराडी, बाणेर, कल्याणीनगर आणि चिंचवड लिंक रस्ता येथील ‘व्होडाफोन’च्या दुकानांपाशी ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ बांधण्यात आले आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link