Next
‘विवेकानंद’मधील विद्यार्थ्यांची आझम मशिदीला भेट
प्रेस रिलीज
Wednesday, October 03, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:पुणे : गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मस्जिद-ए-आझम मशिदीला सदिच्छा भेट दिली. आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी या भेटीचे आयोजन केले.

या उपक्रमात रोटरी क्लब पुणे लोकमान्यनगरने पुढाकार घेतला. आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शैला बुटवाला यांनी स्वागत केले. सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभाव वाढीस लागावा, या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत १० ते १६ वयोगटातील सुमारे ४० विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी डॉ. आफताब आलम, खालिद अर्षद, उस्मा शेख, मंदार कुलकर्णी, प्रदीप आवटे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 96 Days ago
The more we know about each other , the better . This activity should be carried out more often .
0
0

Select Language
Share Link
 
Search