Next
‘फुलरटन’ची ‘पेटीएम’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 03:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (फुलरटन इंडिया) या भारतभर सक्षम कार्यविस्तार असलेल्या आघाडीच्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीने ‘पेटीएम’सोबत भागीदारी केली आहे. फुलरटन इंडियाच्या ग्राहकांना विनासायास सुलभेतेने आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.

फुलरटन इंडियाच्या ग्राहकांना फक्त एका क्लिकद्वारे पेटीएमच्या माध्यमातून आपले समान मासिक हप्ते (ईएमआय) तसेच मागील थकबा​​की भरता यावी यासाठी आणि त्याद्वारे ग्राहकांना एक उत्तम विस्तारित अनुभूती मिळावी हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

या कागदपत्रविरहीत आणि सुरक्षित व्यासपीठाच्या माध्यमातून ग्राहक आता आपले कर्जाचे हप्ते सुरक्षितपणे आणि सुलभतेने फुलरटन इंडियाच्या संकेतस्थळावरून किंवा पेटीएम अ‍ॅपमध्ये लॉग इन करून भरू शकणार आहेत.यामुळे ग्राहकांना आपले पेमेंट अगदी सहजतेने आणि वेळेवर चुकते करणे शक्य होणार आहे. सध्या ही सेवा फुलरटन इंडियाच्या शहरी व्यवसायातील ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.

या भागीदारीबाबत बोलताना फुलरटन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजश्री नंबियार म्हणाल्या, ‘नाविन्यपूर्ण आणि रोकडविरहीत पेमेंट सोल्युशन्सच्या आजच्या प्रवाहामध्ये ग्राहकांना पेमेंट व्यवहारांसाठी पर्यायी उपयोजना उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनलेली आहे. ‘पेटीएम’सोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद झाला असून, त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एक विनासायास आणि सुकर पेमेंट सोल्युशन पुरविणे आम्हाला शक्य झाले आहे. एवढेच नव्हे, तर ही भागीदारी म्हणजे संपूर्ण एकात्मिक क्रांतिकारी डिजिटल प्रक्रिया अंगीकारून त्यायोगे स्थिर, सक्षम प्रगती साध्य करण्याच्या फुलरटन इंडियाच्या ध्येयधोरणाला पूरक ठरणार आहे.’

डिजिटल उपायोजना अंगीकारून ग्राहकांना अधिक सुधारित कार्य अनुभूती मिळवून देण्यासाठी फुलरटन इंडिया कटिबद्ध आहे. कंपनीतर्फे फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून आशा या नावाचे एक स्वयं अध्ययन चॅटबोट चालविले जाते. कर्जासाठी अर्ज प्रस्ताव तयार करणे, अर्ज दाखल करणे आणि कर्जाची मंजुरी मिळवणे यासाठी हे एक संवादी माध्यम आहे. वैयक्तिक कर्ज हवे असण्यार्‍या लक्षावधी ग्राहकांसाठी फुलरटन इंडियातर्फे इंस्टालोन हे एक अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे. बायो-मेट्रिक ऑथेंटीकेशन प्रक्रिया आणि व्यवहार उपकरणे हे कंपनीतर्फे भारतात राबविले जाणारे काही खास उपक्रम आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link