Next
‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
BOI
Friday, August 30, 2019 | 03:46 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सगळीकडे मंदीची चर्चा सुरू असताना, पुण्यात ‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात ४५ कंपन्या आणि हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावली. यातून साधारण २५० उमेदवारांना १२ ते ४० हजार रुपयांपर्यंतची नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व ‘फ्रेशर्स जॉबफेअर’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बावधन कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्याला पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नागपूर, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांतून आणि झारखंड, जबलपूर आदी ठिकाणांवरून उमेदवार आले होते. पदवीधर, बीई, बीटेक, फार्मसी, आयटीआय, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. एचआर, फायनान्स, सेल्स, आयटी, डेव्हलपर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, बीपीओ, केपीओ मधील पदांसाठी या मुलाखती झाल्या. इन्फोसिस, एचसीएल, अॅक्सिस बँक, जिंदाल इलेक्ट्रिक, एनआयआयटी, रिलायन्स, एच. आर. ग्लोबल, टी.एस. कन्सलटिंग, टाटा, युरेका फोर्ब्स, करियर मॅनेजमेंट, आदी कंपन्यानी यात सहभाग घेतला. 


या वेळी स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे सल्लागार सचिन इटकर, भाजप नेते किरण दगडे पाटील, ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालक शैलेश कासंडे, कॅप्टन शालिनी नायर, ‘फ्रेशर्स जॉबफेअर’चे श्रीधर गुटी आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘येथे एकाच छताखाली दोन-तीन कंपन्यांसाठी मुलाखती देण्याची संधी मिळाली, त्यामुळे नोकरीचे विविध पर्याय उपलब्ध झाले, ही दिलासादायक बाब आहे,’ असे मत उमेदवारांनी व्यक्त केले.

 

‘देशातील उद्योगक्षेत्र कठीण काळातून जात असताना अशा प्रकारचा रोजगार मेळावा होणे आणि त्याला हजारो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग मिळणे, ही आश्वासक स्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या आणि नोकरी हवी असलेल्या तरुणांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून एकत्र आणण्याचा सूर्यदत्ता संस्थेचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे,’ असे मत स्ट्रॅटेजिक फोरसाइट कंपनीचे सल्लगार सचिन इटकर यांनी व्यक्त केले.

‘कंपन्यांना चांगले मनुष्यबळ, तर विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या हव्या आहेत. या दोहोंमध्ये समन्वय घडवण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा आयोजिला. कमी कालावधीत नियोजन करूनही विद्यार्थ्यांचा आणि कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून अनेकांना नोकऱ्या मिळतील, याचे समाधान आहे,’ अशी प्रतिक्रिया सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search