Next
रियासतकार सरदेसाई, गॅरी पॉलसन
BOI
Thursday, May 17, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘दी ग्रेटेस्ट लिव्हिंग हिस्टोरिअन ऑफ दी मराठाज’ अशी कौतुकाची पावती सर जदुनाथ सरकारांकडून मिळवणारे रियासतकार सरदेसाई आणि प्रामुख्याने पौगंडावस्थेतल्या अमेरिकन मुलामुलींमध्ये प्रिय असणारा लेखक गॅरी पॉलसन यांचा १७ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 
गोविंद सखाराम सरदेसाई 

१७ मे १८६५ रोजी गोविलमध्ये (रत्नागिरी) जन्मलेले गोविंद सखाराम सरदेसाई हे ‘रियासतकार’ उपाधीने ओळखले जाणारे महान इतिहास संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. सर जदुनाथ सरकारांसारख्या जगन्मान्य श्रेष्ठ इतिहास संशोधकांनीसुद्धा सरदेसाईंचं ‘दी ग्रेटेस्ट लिव्हिंग हिस्टोरिअन ऑफ दी मराठाज’ अशा शब्दांत कौतुक केलं होतं. आयुष्यभर त्यांनी इतिहासलेखन आणि संशोधनाला वाहून घेतलं होतं. 
सरदेसाई यांनी मराठी रियासत, मुसलमानी रियासत आणि ब्रिटिश रियासत असे प्रमुख ग्रंथ लिहिले. रियासतीच्या तेरा खंडांद्वारे त्यांनी हिंदुस्थानचा संगतवार इतिहास लिहिला. त्यामुळे ते ‘रियासतकार’ म्हणूनच ओळखले जातात.

याव्यतिरिक्त त्यांनी  ऐतिहासिक वंशावळी, ऐतिहासिक घराणी, ऐतिहासिक पत्रव्यवहार, अनुपुराण, शालोपयोगी भारतवर्ष, बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास असं लेखन, तसंच पेशवे दप्तरातल्या कागदपत्रांचं संशोधन करून ४५ खंड संपादित करून प्रकाशित केले होते. 

त्यांना इतिहासमार्तंड, रावबहादूर, डि. लिट. अशा पदव्यांनी सन्मानित करण्यात आलं होतं.  

१९५१ मध्ये जयपूरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष होते. 

त्यांना १९५७ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

२९ नोव्हेंबर १९५९ रोजी कामशेतमध्ये त्यांचं निधन झालं. 

(गोविंद सखाराम सरदेसाई यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

गॅरी पॉलसन
 
१७ मे १९३९ रोजी मिनीआपलीसमध्ये जन्मलेला गॅरी पॉलसन हा प्रामुख्याने पौगंडावस्थेतल्या अमेरिकन मुलामुलींमध्ये प्रिय असणारा लेखक! बालपणी हातात आलेल्या पहिल्याच पुस्तकाने झपाटून जाऊन घराच्या बेसमेंटमध्ये बसून अधाश्यासारखं पुस्तक वाचून संपवणाऱ्या पॉलसनने नंतर वाचनाचा सपाटाच लावला आणि मोठेपणी त्याने लेखकच होणं हे जणू विधिलिखितच असावं. 

कधी शेतात काम करणे, तर कधी कन्स्ट्रक्शन साइटवर, कधी ट्रक ड्रायव्हिंग करणे, तर कधी खलाशी म्हणून सागर सफर करणे, कधी सॅटेलाइट टेक्निशियन म्हणून काम करणे, तर कधी हॉलीवूडमध्ये मॅगझिन प्रूफरीडिंग करणे, असे विविध अनुभव त्याने घेतले आणि त्यातून त्याचं लिखाण घडत गेलं.   

दी विंटर रूम, हॅचेट, डॉगसाँग, रोड ट्रीप, फॅमिली टाइज, व्होट, क्रश, लायर, पेंटिंग्ज फ्रॉम दी केव्ह, दी अमेझिंग लाइफ ऑफ दी बर्डस्, लॉन बॉय, गट्स, दी क्विल्स् , दी ट्रान्साल सागा, सोल्जर्स हार्ट, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link