Next
‘टाटा’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ सेवा
प्रेस रिलीज
Friday, November 02, 2018 | 02:15 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ग्राहकांना आपल्या वीज वापरावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता यावे, यासाठी ‘टाटा पॉवर’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ या नव्या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे ग्राहकांना किती वीज वापर होत आहे हे ऑनलाइन पाहता येणार आहे.

या अंतर्गत टाटा पॉवरचे ग्राहक कोणत्याही महिना, दिवस आणि तास यातील त्यांचा वीज वापर पाहू शकतात. एका बटणाच्या क्लिकवर ही सेवा उपलब्ध असून, याद्वारे ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराचा आराखडा अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे. यामुळे विजेच्या बिलातील दुरुस्त्या कमी करता येणार आहेत. ग्राहकांना ‘टाइम ऑफ द डे टेरिफ’ (ToD) यावर त्यांची मागणी आणि नवे वेळापत्रक व्यवस्थापित करता येईल. यात ऊर्जा घटकांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे, हा याचा अतिरिक्त फायदा आहे.

‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ या नव्या सेवेत अधिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक स्तरातील टाटा पॉवरच्या ग्राहकांचा समावेश आहे; तसेच ज्या ग्राहकांकडे ऑटोमेटेड मीटर रिडिंग (एएमआर) यंत्रणा आहे त्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वापराचा डेटा वेबलिंक किंवा टाटा पॉवरकडून आलेल्या ई-मेलवरील ठराविक कालावधीच्या अपडेटमधून पाहता येईल. ही माहिती सर्वात जास्त एकीकृत आणि ग्राहकांना मूल्याधिष्ठित सेवा देणारी असेल याची खात्री व्हावी यासाठी कंपनीने विस्तृत तपासण्या आणि दिल्या जाणाऱ्या डेटाचे विश्लेषण केले आहे.

टाटा पॉवरचे अध्यक्ष आणि टीअँडडी मनीष दवे म्हणाले, ‘आजच्या घडीला ऊर्जेची किंमत पर्यावरण आणि पारंपरिक आर्थिक सीमांच्या पलीकडे गेले आहे, असे आम्हाला वाटते. दैनंदिन स्तरावर आपल्या विजेचा वापर पाहाणे आणि त्याचे विश्लेषण करणे यामुळे अधिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक स्तरावरील ग्राहकांना वीज बचत करता येणार आहे, याशिवाय त्यांना आपल्या कार्बन उत्सर्जनावरही लक्ष ठेवता येणार आहे, यामुळे ग्राहकांना जबाबदारीचे भान प्राप्त होणार आहे. ‘एएमआर’वर आधारित सेवा आमचा सर्वांत मोठा डिजिटल उपक्रम आहे, आम्ही जे काही करतो त्यात ग्राहकांचे हित पाहाणे या आमच्या तत्त्वज्ञानाला धरूनच हा उपक्रम राबवला जात आहे.’

या सेवेमुळे ग्राहकांना विजेच्या बिलात होणारी अनियमित वाढही टिपता येणार असून, ‘एएमआर’वर आधारित यंत्रणा स्वतः वीज चोरी थांबवू शकणार नाही; पण विजेच्या वापराचे स्पष्ट चित्रण पाहता येईल. यामुळे ग्राहकांना याविरोधात तातडीने कारवाई करता येईल. बिले भरणे, टिनासारखी या वर्षी गुगलद्वारे सादर करण्यात आलेली व्हॉइस-बेस्ड चॅटबॉट अशा अनेक सेवा टाटा पॉवर आपल्या डिजिटल उपक्रमातून पुरवणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link