Next
देवभूमीतील पूरग्रस्तांसाठी धावला ‘पांडुरंग’
BOI
Friday, August 24, 2018 | 02:30 PM
15 0 0
Share this storyसोलापूर :
केरळमध्ये आलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीतून नागरिकांना वाचविण्यासाठी सैन्यदलाचे, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहेत. सोलापूरमधील सेवानिवृत्त जवान पांडुरंग कडाप्पा क्षीरसागर यांनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा खारीचा वाटा म्हणून व्यक्तिशः २५ हजार रुपयांची मदत दिली आहे. आठ वर्षे सैन्यात सेवा बजावल्यानंतर एका प्रशिक्षणादरम्यान अपंगत्व आल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागले; मात्र देशसेवेची त्यांची तळमळ जराही कमी झालेली नाही. 

पांडुरंग क्षीरसागरपांडुरंग क्षीरसागर यांनी १९६३ ते १९७१ या कालावधीत सैन्यदलाच्या इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेत सिकंदराबाद येथे सेवा बजावली. पॅराशूट ट्रेनिंगच्या वेळी अपघात झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. त्यामुळे त्यांना लष्करातून सेवानिवृत्त व्हावे लागले. आता ते सोलापूरमधील शिवाजीनगर परिसरात राहतात. त्यांना एक मुलगी असून, ती जिल्हा न्यायालयात लिपिक म्हणून काम करते. 

केरळमध्ये आलेले संकट पाहून आपणही मदतीचा खारीचा वाटा उचलावा, अशी तीव्र इच्छा क्षीरसागर यांना झाली. त्यामुळे क्षीरसागर यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रमेश राजिगरे उपस्थित होते. ‘भाऊ अडचणीत असता, तर त्याला मदत केली असतीच ना. मग आज केरळमधील अनेक बांधव पुरामुळे अडचणीत असताना, त्यांना मदत करायला नको का? म्हणून मी ही आर्थिक मदत केली,’ अशी भावना पांडुरंग क्षीरसागर यांनी व्यक्त केली. 

‘सैन्यात असताना माझ्याबरोबर अनेक सहकारी केरळमधील होते. पुराच्या बातम्या बघून, वाचून त्यापैकी काही जणांची आठवण आली. वारंवार काहीतरी मदत द्यावी, असे वाटत होते. शेवटी आज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धनादेश दिला आणि मगच मनाला थोडा दिलासा मिळाला,’ असेही ते म्हणाले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link