Next
‘भारतातील प्री-ओन्ड कार क्षेत्र प्रगल्भ’
‘इंडिया प्री-ओन्ड कार मार्केट रिपोर्ट’ची तिसरी आवृत्ती प्रकाशित
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 04:51 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : भारतातील प्री-ओन्ड कार क्षेत्र प्रगल्भ होत असून, निर्णय घेण्याच्या ग्राहकांच्या प्रक्रियेवर डिजिटायझेशनचा परिणाम होत असल्याचे ‘इंडिया प्री-ओन्ड कार मार्केट रिपोर्ट’मध्ये नमूद करण्यात आले आहे. इंडियन ब्ल्यू बुक (आयबीबी) या नव्या व प्री-ओन्ड कार वाहनांसाठीच्या भारतातील पहिल्या प्रायसिंग व अॅनालिटिक्स सुविधेने ‘इंडिया प्री-ओन्ड कार मार्केट रिपोर्ट’ची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली.

गेल्या दोन वर्षांमध्ये हा उद्योग काहीसा प्रगल्भ झाला असून, नवी बिझनेस मॉडेल तपासून पाहिली जात आहेत, वाहनांच्या नव्या श्रेणी दाखल केल्या जात आहेत व दीर्घकाळ अवघड समजल्या गेलेल्या समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन अवलंबले जात आहेत.

या विषयी बोलताना ‘महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष पांडे म्हणाले, ‘भारतातील प्री-ओन्ड कार वाहनांचे क्षेत्र विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. ग्राहकांचे प्राधान्य, खरेदीबाबतचे वर्तन, व्यवसाय व निधीपुरवठा आणि कार्यपद्धती अशा आपल्याभोवतीची प्रत्येक गोष्ट बदलते आहे. तीन मुख्य वैशिष्ट्ये असणारी मॉडेल या बाबतीत विजेती ठरत आहेत, असे मत निर्माण होत आहे. अनपेक्षित नसणारा व रंजक बदल म्हणजे, ग्राहकांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर होणारा तंत्रज्ञानाचा परिणाम, किंमतीच्या बाबतीत पारदर्शकता व वाहन शोधण्यातील सुलभता यामुळे प्री-ओन्ड कार क्षेत्रामध्ये नवे विश्वासार्ह चॅनल निर्माण होत आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search