Next
‘सिस्का’ची भारतात १७० कोटींची गुंतवणूक
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 04:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एलईडी लाइट्सद्वारे लायटिंग उत्पादने ही खासियत असलेल्या सिस्का समूहाने भारतात अंदाजे १७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ‘सिस्का’ने देशातील लायटिंग उत्पादनांसाठी तीन उत्पादन प्रकल्प उभारले आहेत. पुणे येथे मुख्यालय असलेली सिस्का ही शिरवळ, रबाळे व चाकण येथे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या या क्षेत्रातील मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे.

सिस्का एलईडी लाइट्समुळे शाश्वत पर्यावरणाच्या निर्मितीला चालना दिली जाते व ऊर्जेचा कमी वापरणाऱ्या दिव्यांचा अवलंब केला जातो. कार्यक्षम लायटिंग उत्पादने उपलब्ध करण्यासाठी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानला अनुसरून सिस्का कार्यरत आहे. उत्पादन प्रकल्पांमध्ये बल्ब, ट्युबलाइट, पॅनल लाइट, इंडस्ट्रीअल लाइट अशा लायटिंगचे प्रचंड प्रमाणात उत्पादन केले जाईल. सिस्का समूहाच्या या गुंतवणुकीमुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

गुंतवणुकीविषयी बोलताना सिस्का समूहाचे संचालक राजेश उत्तमचंदानी म्हणाले, ‘सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाच्या अभियानाला पाठिंबा देणे गरजेचे आहे, हे सिस्काचे मत आहे. आम्ही गेली ३०हून अधिक वर्षे भारतीय बाजारामध्ये कमी ऊर्जा वापरणारी विविध प्रकारची उत्पादने व आंतरराष्ट्रीय दर्जाची नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करत आहोत. देशात रोजगाराची निर्मिती करण्याबरोबरच, भारतात आमच्या गुंतवणुकीला चालना व प्राधान्य देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे आणि यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारी ही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. आम्ही लक्षणीय प्रगती साधण्यासाठी सज्ज आहोत आणि सिस्काद्वारे अधिक उत्तम भारत व भविष्य साकारण्याची तयारी करत आहोत.’

सिस्काचे देशात सध्या तीन उत्पादन प्रकल्प आहेत आणि नजिकच्या काळात आणखी काही प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. सिस्काने केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत शिरवळ प्रकल्पामध्ये अंदाजे १५० कोटींची गुंतवणूक केली आहे आणि शिरवळ एमआयडीसीमध्ये पाच एकर इतकी जमीन निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. प्रकल्पाची उत्पादन क्षमता दरमहा अंदाजे ३० लाख युनिट आहे आणि त्यामध्ये एक हजार कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

चाकण येथील ४० हजार चौरस फूट प्रकल्पामध्ये अंदाजे १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प सध्या सुरू आहे व दररोज १२ तासांच्या पाळ्यांमध्ये अंदाजे ७०० ते एक हजार युनिट इंडस्ट्रीअल लाइट्सचे उत्पादन करत आहे आणि ही क्षमता दररोज तीन हजार युनिटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे; तसेच रबाळे येथील ठाणे एमआयडीसीतील २० हजार चौरस फूट प्रकल्पामध्ये अंदाजे १० कोटी रुपये गुंतवले आहेत. हा प्रकल्प सध्या सुरू आहे व दरमहा अंदाजे सात लाख बल्ब व वीस हजार पॅनल लाइटचे उत्पादन करत आहे. रबाळे प्रकल्पाकडे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन व विकास आणि टेस्टिंग लॅब असून त्यास एनएबीएल अक्रिडिटेशन मिळालेले आहे.
 
२०१२मध्ये स्थापन झाल्यापासून सिस्का समूहाने प्रगती केली आहे आणि सिस्का एलईडी, सिस्का पर्सनल केअर, सिस्का आर्यन्स अशा विविध श्रेणींमध्ये वैविध्य साधले आहे. हा समूह दिवसेंदिवस वाढत आहे व या बाजारातील प्रभुत्व सिद्ध करत आहे. कंपनीकडे एलईडीपासून पर्सनल केअर ते मोबाइल अक्सेसरीजपर्यंत विविध प्रकारची उत्पादने आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link