Next
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना सीओईपीमध्ये शिक्षण घेण्याची संधी
प्रेस रिलीज
Wednesday, July 04, 2018 | 12:10 PM
15 0 0
Share this story

 सीओईपी येथे शिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या डीकेटीईच्या तीन विद्यार्थीनींचा सत्कार करताना डॉ. कडोले, डॉ. पाटील, डॉ. आडमुठे व डॉ आर. एन. पाटील.

इचलकरंजी :  येथील डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, (सीओईपी) यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करारांतर्गत डीकेटीईतील  इंजिनिअरींगच्या तीन विद्यार्थीनी एका सेमिस्टरसाठी सीओईपी येथे शिक्षण घेणार आहेत. या आधी डीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांनी एक महिना प्रशिक्षण घेतले आहे.

एआयसीटीई मार्गदर्शन योजने अंतर्गत करण्यात आलेल्या या करारानुसार, दरवर्षी डीकेटीईच्या काही विद्यार्थ्यांना आठ सेमिस्टरपैकी एका सेमिस्टरसाठी सीओईपीमध्ये शिकण्याची संधी मिळेल. हे विद्यार्थी येथे त्या सेमिस्टरची परीक्षाही देतील. त्यात त्यांना मिळालेले गुण क्रेडीटच्या स्वरुपात त्यांच्या डीकेटीईच्या गुणपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात येतील. अलीकडेच सीओईपीचे संचालक प्रा. डॉ. बी. बी. अहुजा, प्रा. डॉ. एस.एस. परदेशी व प्रा. डॉ. एन. के. चौगुले यांनी डीकेटीईस भेट दिली. त्या वेळी हा करार करण्यात आला. या करारामुळे सीओईपीतील आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांचा लाभ डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना मिळत असून, डीकेटीईतील प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना सीओईपी येथे पीएचडी करण्याकरतादेखील  प्राधान्य मिळणार आहे. 

डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्समधील अपूर्वा पिसे, इलेक्ट्रॉनिक्समधील हिरकणी दाणेकरी व आर्या कुलकर्णी या तीन विद्यार्थीनी एका सेमिस्टरसाठी सीओईपी येथे शिक्षण घेण्यासाठी रवाना होत आहेत. या आधी कीर्ती किर्तने व ॠषीकेश देसाई यांनी एका महिन्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले,  उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, डॉ. एल. एस. अडमुठे, डीन प्रा. आर. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. असे संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link