Next
किफायतशीर मानवी दूध पाश्चरायझर यंत्राची पुण्यात निर्मिती
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 03:51 PM
15 0 0
Share this story

पोर्टेबल ‘ह्युमन मिल्क पाश्चरायझर’ यंत्राची माहिती देताना पुण्यातील ‘श्रीयश इलेक्ट्रो मेडिकल्स’चे संचालक डॉ. सुधीर वाघमारे आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया अँड लॉसअँजिलीसमधील नवजात अतिदक्षता विभागाचे संचालक डॉ. उदय देवासकर.

पुणे : अनेक वेळा आईला अंगावर पुरेसे दूध न आल्यामुळे नवजात अर्भकाला सर्वोत्तम पोषण आणि आजार, संसर्गांपासून संरक्षण देणाऱ्या आईच्या दुधास मुकावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून आईचे दूध संकलित आणि संरक्षित केले जाते. मात्र, यासाठी लागणारी यंत्रणा परदेशातून आयात केली जात असल्याने तिचा खर्च प्रचंड आहे. त्यामुळे गरज असूनही अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन पुण्यातील संशोधक आणि ‘श्रीयश इलेक्ट्रो मेडिकल्स’चे संचालक,  डॉ. सुधीर वाघमारे यांनी ‘किमी’ हे पहिले पोर्टेबल ‘ह्युमन मिल्क पाश्चरायझर’ यंत्र विकसित केले आहे. 

‘या यंत्राची किंमत केवळ आठ लाख रुपये असून, जागाही अगदी कमीत कमी लागते. हे यंत्र १५ ते ३०० मि.ली एवढे मानवी दूध पाश्चराईझ करू शकते. भारतात  ह्युमन मिल्क (अर्थात मानवी दूध) पाश्चरायझर, फ्रान्समधून आयात केले जाते. त्याला दोनशे पन्नास चौरस फूट जागा आणि ५० लाखपर्यंत खर्च येतो. या सुरुवातीच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे आणि उच्च आवर्ती खर्चांमुळे अनेक दवाखान्यांना ही सोय परवडत नाही, ज्यामुळे अर्भकांना त्यांच्या हक्काच्या पोषणापासून वंचित रहावे लागते;पण ‘किमी’ यंत्रामुळे आता ग्रामीण भागातील छोट्या दवाखान्यांमध्येही ही सुविधा पुरवणे शक्य होईल. भारतातील प्रत्येक इस्पितळाला परवडेल असे जागतिक दर्जाचे मशीन बनविण्याचा माझा निश्चय होता. जेणेकरून कुठल्याही बालकाला सर्वोत्तम पोषणाचा स्रोत असलेल्या आईच्या दुधापासून वंचित रहावे लागू नये’, असे डॉ. सुधीर वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या वेळी डॉ. उदय देवासकर, संचालक, नवजात अतिदक्षता विभाग, यु.सी.एल.ए (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया अँड लॉसअँजिलीस), डॉ. किरण पुरोहित, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ उपस्थित होते.

डॉ. उदय देवासकर म्हणाले, ‘किमी हा एक क्रांतिकारी शोध आहे, जो जागतिक दर्जाची गुणवत्ता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देतो. सद्यस्थितीत भारतासारख्या देशाची गरज आहे. स्तनपानामुळे, दर वर्षी होणारे जवळजवळ वीस लाख बालमृत्यू टाळले जाऊ शकतात.’ 

‘रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ तर्फे येत्या आठ जून रोजी केईएम रुग्णालयाला हे ‘किमी’ यंत्र भेट देण्यात येणार आहे’, अशी माहिती डॉ. किरण पुरोहित यांनी दिली.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Milind About 284 Days ago
Dr. Waghmare is a genious. Hats off to him and his innovation. India needs such affordable yet highly advanced technologies. We need more such unique producta. Congratulations Dr Waghmare and Dr Devaskar.
1
0

Select Language
Share Link