Next
‘रेड एफएम’तर्फे ‘इंडी हैं हम’ सादर
प्रेस रिलीज
Friday, July 26, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ९३.५ रेड एफएम या सर्वांत मोठ्या आणि सर्वाधिक पुरस्कारप्राप्त रेडिओ नेटवर्कने ‘इंडी हैं हम’ हा आपला नवा शो सादर केला. भारतातील स्वतंत्र गायक आणि स्वतंत्र संगीत (इंडिपेंडंट म्युझिक) क्षेत्राला पाठिंबा देऊन त्याचा प्रसार करण्यासाठी रेड इंडीज या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतील हार्ड रॉक कॅफे येथे रेड एफएमची टीम आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत दर्शन रावल यांनी या कार्यक्रमाचे अनावरण केले.

इंडियन इंडिपेंडंट म्युझिकच्या स्वरूपात भारतात सध्या सादर होत असलेल्या वेगळ्या धाटणीच्या संगीताची त्यांची वाढती आवड लक्षात घेऊन या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. रेड एफएमने ‘इंडी है हम’ हा खास वीकेंड शो सुरू केला आहे. दर्शन रावल हा शो सादर करणार आहेत. वेगाने वाढणाऱ्या इंडियन इंडिपेंडंट म्युझिक क्षेत्रातील अमर्याद संधींचा मागोवा या कार्यक्रमातून घेण्यात येईल. शून्यातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि भारतीय तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या इंडी म्युझिक कलाकारांवर प्रत्येक एपिसोडमध्ये प्रकाशझोत टाकला जाईल. नव्या कलाकारांना आपली प्रतिभा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ असेल.

या कार्यक्रमाच्या सादरीकरणाबद्दल रेड एफएम आणि मॅजिक एफएमच्या सीओओ आणि डायरेक्टर निशा नारायणयन म्हणाल्या, ‘रेड इंडीजमध्ये भाषा आणि व्यासपीठापलीकडे जाऊन विचार करत भारतभरातील कलाकारांच्या संगीताचा शोध घेतला जाणार आहे. कोणत्याही प्रकारात अडकून न पडता सर्व प्रकारच्या संगीतप्रेमींसाठी उत्कृष्ट संगीत सादर करणे हाच रेड एफएमचा उद्देश आहे. इंडिपेंडंट आणि बॉलिवूड संगीतातील फरक पुसून टाकण्याचा प्रयत्न रेड एफएम करत आहे. रेड इंडीजअंतर्गत ‘इंडी हैं हम’ हा आमचा पहिला शो रेडिओ आणि संगीत क्षेत्रात लक्षणीय बदल करून इंडी आर्टिस्ट समुदायाच्या प्रगतीला हातभार लावेल, असा आम्हाला विश्वास आहे.’


या कार्यक्रमाबद्दल प्रसिद्ध गायक दर्शन रावल म्हणाले, ‘संगीतामुळे लोक एकत्र आले की तिथे कोणत्याही सीमारेषा उरत नाहीत, भाषेची बंधने उरत नाहीत. रेड एफएमने माझ्यासारख्या इंडिपेंडंट आर्टिस्टना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी रेड इंडीज हा कार्यक्रम सुरू केल्याचा मला आनंद आहे. भारतातील उत्क्रांत होत जाणाऱ्या संगीतक्षेत्राचा नेमका अर्क जपण्यासाठी देशभरातील इंडिपेंडंट आर्टिस्ट एकत्र यावेत यासाठी ‘इंडी हैं हम’ हे एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल. ‘इंडी हैं हम’चा निवेदक म्हणून चोखंदळ संगीतप्रेमींसाठी मी काही नव्या आणि उत्तमोत्तम कलाकरांना भेटण्यास उत्सुक आहे.’

गेल्या काही वर्षांत इंडी म्युझिकने देशात लोकप्रियता मिळवली आहे. इंडिपेंडंट संगीत आणि कलाकार एकूण संगीतक्षेत्रात मोलाची भर करत असतात. त्यामुळे भारतातील या छुप्या प्रतिभेला सर्वांसमोर आणण्यात ‘इंडी हैं हम’ अत्यंत मोलाची भूमिका बजावेल. रेड एफएम ही दरी भरून काढत विविध प्रादेशिक स्तरावरील कलाकारांना सक्षम करत त्यांची प्रतिभा आणि त्यांची कला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search