Next
‘एआयसीटीई’चे डॉ. ए. पी. मित्तल यांची ‘डीकेटीई’ला भेट
प्रेस रिलीज
Thursday, October 25 | 11:41 AM
15 0 0
Share this story

इचलकरंजी येथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग  इन्स्टिट्यूट भेट पाहणी करताना ऑल इंडिया टेक्नीकल एज्युकेशनचे सदस्य सचिव प्रा. डॉ. ए. पी. मित्त.सोबत मान्यवर.

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग  इन्स्टिट्यूटला नवी दिल्लीतील ऑल इंडिया टेक्नीकल एज्युकेशनचे (एआयसीटीई) सदस्य सचिव प्रा. डॉ. ए. पी. मित्तल यांनी भेट दिली.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग क्षेत्रात डॉ. मित्तल यांनी ख्याती असून, जागतिक संशोधनात्मक व शैक्षणिकविषयक कार्य पाहून त्यांना भारतातील वेगवेगळ्या ख्यातनाम संस्थांवर त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे. डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना संशोधनात्मक कार्यासाठी ५० कोटींची मशिनरी, तंत्रज्ञान, संशोधन याची पाहणी त्यांनी केली.

या वेळी बोलताना डॉ. मित्तल म्हणाले, ‘देशाचा भावी अभियंता हा इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या बदलाचे आव्हान पेलणारा हवा असेल, तर त्या पद्धतीचे उत्तम शिक्षण देणाऱ्या व इंडस्ट्रीशी उत्तम संबंध असलेल्या डीकेटीईसारख्या संस्था देशासाठी गरजेच्या आहेत. डीकेटीईमध्ये उद्योगाला पुरक असे अद्ययावत शिक्षण आहे; तसेच इंडस्ट्री सर्व्हिसेस, कन्सल्टन्सी, इंडस्ट्री इन्स्टिट्यूटशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करार, संशोधन, अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, प्लेसमेंट, उद्योग जगताशी असलेले बहुआयामी संबंध, प्राध्यापक व विद्यार्थी गुणवत्तेवर दिलेला भर या मुळेच ‘एआयसीटीई’ने डीकेटीईला ‘बेस्ट इंडस्ट्री-लिंक्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट’ या देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने दोनदा सन्मानित केले आहे.’

‘इंडस्ट्रीज व माजी विद्यार्थ्यांशी असलेले चांगले संबंध, विद्यार्थी कल्याणासाठी केलेले विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्याशी शैक्षणिक व औद्योगिक सामंजस्य करार, सेमिनार, वर्कशॉप व कॉन्फरन्स, तसेच गेली ३५ वर्षे सातत्याने टेक्स्टाइल विभागात होत असलेल्या १०० टक्के प्लेसमेंटचे कार्य अद्वितीय आहे,’ असे डॉ. मित्तल यांनी नमूद केले.
 
यानंतर डॉ. मित्तल यांनी डीकेटीईतील प्राध्यापकांसाठी संशोधनात्मक मार्गदर्शन केले. डीकेटीईच्या या प्रगतशील वाटचालीमध्ये संस्थेचे मॅनेजमेंट, प्राचार्य व येथील प्राध्यापकांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.

डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी डॉ. मित्तल यांचे स्वागत केले. या वेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, प्रतापसिंह देसाई, महेश काकडे, डीकेटीईचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही कडोले, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील व सर्व विभागप्रमुख यांच्यासह डीन्स व प्राध्यापक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link