Next
‘हुजपा’ महाविद्यालयाला ‘नॅक’कडून ‘बी’ दर्जा
नागेश शिंदे
Friday, March 29, 2019 | 03:13 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाला ‘नॅक’कडून ‘बी’ दर्जा देण्यात आला आहे. २४ आणि २५ मार्चला ‘नॅक’च्या बेंगळुरू कार्यालयाकडून त्रिसदस्यीय समिती हिमायतनगर शहरात दाखल झाली होती. त्या समितीने हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. 

२८ मार्च रोजी सायंकाळी नॅक समितीच्या संकेतस्थळावर संपूर्ण राज्यातील महाविद्यालयांचे मानांकन जाहीर झाले. त्यामध्ये ‘हुजपा’ला २.४८ या ‘सीजीपीए’नुसार बी दर्जा देण्यात आला आहे. हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्यातील हे एकमेव वरिष्ठ महाविद्यालय असून, या महाविद्यालयाची नॅक मूल्यांकनाची ही पहिली साखळी होती. 



मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सूर्यकांता पाटील, सचिव डॉ. देवेंद्र जोशी, कोशाध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी हुजपा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्व्सला सदावर्ते, महाविद्यालयाचे ‘आयक्यूएसी’ समन्वयक प्रा. आशिष दिवडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search