Next
सहकारनगरमध्येही ‘जीविधा कट्टा’
प्रेस रिलीज
Wednesday, August 22 | 04:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘सहकारनगरमध्ये पर्यावरणविषयक चर्चेसाठी ‘जीविधा कट्टा‘ स्थापन करण्यात येत असून,त्याचे उद्घाटन शनिवारी, २५ ऑगस्ट रोजी होणार आहे’, अशी माहिती ‘जीविधा’चे संचालक राजीव पंडित यांनी दिली. 

सहकारनगर दोन येथील मधुमालती सभागृहात शनिवारी संध्याकाळी साडे सहा वाजता पक्षीतज्ज्ञ, ‘इला फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांच्या ‘चिमणी संवर्धन’ या विषयावरील व्याख्यानाने या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. 

डॉ. सतीश पांडे
‘जीविधाच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त हा कट्टा स्थापन करण्यात येत असून, सहकारनगर परिसरात दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी हा कट्टा भरेल. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी जीविधा कट्टा पुणे महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात सुरू आहेच’, असेही पंडीत यांनी सांगितले.  

‘पुणे शहरातील व्यग्र जीवन आणि ट्रॅफिक जॅम सारख्या समस्यांमुळे पर्यावरणाच्या चळवळीत सर्वसामान्यांना सहभागी होणे जमत नाही. त्यामुळे या विषयातील कार्यक्रम शहरातील विविध भागात आयोजित करणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने सहकारनगर परिसरात जीविधा कट्टा सरू करत आहोत. हा उपक्रम सर्वांसाठी व विनामूल्य खुला आहे. प्रीतम तुळशीबागवाले व सुधीर राव हे या मासिक कट्टयाची जबाबदारी सांभाळणार आहेत’, असेही पंडित म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link