Next
‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयसोबत दिसणार कतरिना कैफ
नऊ वर्षांनंतर जोडी पडद्यावर एकत्र दिसणार
BOI
Tuesday, April 23, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ फेम रोहित शेट्टीचा आगामी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता अक्षय कुमार चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत आता कतरिना कैफ या चित्रपटात दिसणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे या अभिनेत्रींची नावे या भूमिकेसाठी चर्चेत होती. 

‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ या दोन्ही हिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एका चित्रपटाच्या तयारीत होता. हा आगामी चित्रपटही असाच अॅक्शनपट असणार अशी आशा सर्वांनाच होती. त्याप्रमाणेत रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’ची घोषणा केली. अभिनेता अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाची अभिनेत्री कोण असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यानच्या काळात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांचीही नावे चर्चेत होती. अखेर हा तिढा सुटला असून आता कतरिना कैफच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

‘ब्लू’, ‘दे दणा दण’, ‘नमस्ते लंडन’, ‘तीस मार खान’, ‘हमको दिवाना कर गए’, ‘वेलकम’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून अक्षय-कतरिनाची तुफान केमेस्ट्री दिसली आहे. प्रेक्षकांनीही या जोडीला नेहमीच पसंती दिली. ‘सूर्यवंशी’च्या निमित्ताने तब्बल नऊ वर्षांनंतर हो जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे. अर्थातच प्रेक्षकही या जोडीची केमेस्ट्री पाहण्यास उत्सुक आहेत. चित्रपटाचा व्यापार विश्लेषक तरण आदर्श याने नुकतेच एक ट्विट करून कतरिना कैफ चित्रपटाची अभिनेत्री असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

आणखी एका विशेष कारणामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे, तो म्हणजे चित्रपटाच्या नावाचे स्पेलिंग. सूर्यवंशी हे लिहिण्यासाठी यू (U) न वापरता दोन वेळा ओ (O) वापरला आहे. यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शनचा भरणा असणारा चित्रपट घेऊन येत आहे, हे नक्की... 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search