Next
‘टायटन’चा वस्त्रप्रावरणाच्या क्षेत्रात प्रवेश
‘तनाएरा’ ब्रँडचे नवी दिल्लीत उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, December 14, 2018 | 05:58 PM
15 0 0
Share this article:

टायटनच्या ‘तनाएरा’ या वस्त्रप्रावरणांच्या ब्रँडच्या नवी दिल्लीतील पहिल्या दालनाचे उद्घाटन अभिनेत्री कंगना राणावत हिच्या हस्ते झाले. या वेळी टायटनचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर भट व अजोय चावला उपस्थित होते.

नवी दिल्ली : घड्याळे, दागिने, अशा जीवनशैलीशी निगडीत वस्तूंच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या टायटन कंपनीने ‘तनाएरा’ हा वस्त्रप्रावरणांचा खास ब्रँड दाखल केला आहे. नवी दिल्ली साऊथ एक्स्टेंशन-१, येथे या ब्रँडचे पहिले दालन सुरू करण्यात आले असून, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी टायटन कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक भास्कर भट उपस्थित होते.   
           
तब्बल सात हजार ५०० चौरस फुट जागेत विस्तारलेल्या या फ्लॅगशीप स्टोअरमध्ये देशभरातील हातमागाच्या निवडक आणि खास साड्या उपलब्ध असतील. या आकर्षक कलेक्शनमध्ये आसामचे मुगा सिल्क, गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओरिसामधील इक्कत, बंगालची  जामदानी, मध्यप्रदेशमधील चंदेरी, महेश्वरी; तसेच टसर सिल्कमधील अप्रतिम साड्या असतील. या स्टोअरमधील एक संपूर्ण मजला वधूच्या वेशभूषेसाठी असेल. इथे दुर्मिळ अशा रक्तांबरी, श्वेतांबरी, गायसर आणि हजार बुट्टी अशा बनारसी सिल्कच्या साड्या; तसेच अगणित रंगातील कांजीवरम साड्याही उपलब्ध असतील.

याबाबत अधिक माहिती देताना टायटन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर भट म्हणाले, ‘एक कंपनी म्हणून आम्ही टायटन, तनिष्क, फास्टट्रॅक, झायलस, रागा, स्किन (सुगंध) अशा लाइफस्टाइल ब्रँड्समधून स्व-अभिव्यक्तीला नेहमीच चालना दिली आहे. त्यामुळे, आता ‘तनाएरा’ ब्रँडच्या माध्यमातून साड्यांच्या विभागातील प्रवेश हे टायटनसाठी नैसर्गिक वाढीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. 

आम्ही सुरुवात केली त्या वेळेच्या दागिन्यांच्या बाजारपेठेप्रमाणेच, साड्यांची ही बाजारपेठ पाच हजार वर्षे जुनी असली, तरी उत्पादनाच्या अस्सलतेच्या बाबतीत काहीशी मागेच होती. या व्यवसायाच्या प्रयोगात्मक पातळीवर आम्हाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आम्हाला विश्वास वाटतो की, हा व्यवसाय आमच्यासाठी उत्तम ठरेल आणि ग्राहकांना पारदर्शकता आणि अस्सलता देणे आम्हाला शक्य होईल.’

टायटन कंपनी लिमिटेडच्या स्ट्रॅटेजी आणि बिझनेस इनक्युबेशन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजोय चावला म्हणाले, ‘भारतीय कापड उद्योग आणि हस्तकलेचा संपन्न वारसा पाहता ‘तनाएरा’ने साड्यांचा सोहळा करण्याचे ठरवले आहे. अशा साड्या ज्या अस्सल आणि नैसर्गिक धाग्यापासून हाताने विणलेल्या आहेत. भारतातील हातमागाच्या विविध प्रांतातून चोखंदळपणे निवडलेल्या आहेत. त्यामुळे आता एकाच छताखाली व्यापक आणि अनोख्या कलेक्शनचा अनुभव घेता येईल.’

‘‘तन’म्हणजे शरीर आणि ‘ईरा’ म्हणजे कला, संगीत, हस्तकला आणि ज्ञानाची देवी सरस्वतीचे संस्कृतमधील नाव किंवा ग्रीकमध्ये पृथ्वीचे नाव. या शब्दांपासून बनलेल्या ‘तनाएरा’चा मुख्य उद्देश आहे, खोलवर मुळे रुजलेल्या आधुनिक स्त्रीला खास डिझाइन, विविध कलाकुसर, अस्सल हस्तकाम, शुद्ध आणि नैसर्गिक कापड असे सगळे काही एकाच छताखाली उपलब्ध करून देणे. ‘तनाएरा’ सर्वार्थाने असल्लतेचा सोहळा साजरा करते. आमची उत्पादने, आमचा अनुभव, स्टोअरची मांडणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वार्थाने आपले अस्तित्व जपणाऱ्या स्त्रियांसाठी आम्ही हे करत आहोत. आपली आवड म्हणून ती साडी नेसते, जबरदस्ती म्हणून नाही. ती परंपरा साजरी करते; पण त्यात जखडली गेलेली नाही’, असे टायटन कंपनी लिमिटेडच्या व्यवसाय प्रमुख श्यामला रामानन म्हणाल्या.

 ‘ड्युस्टुडिओ’ या डिझाइन फर्मचे संस्थापक ओरोविलास्थित धर्मेश जाडेजा यांनी या दालनाचे डिझाइन केले असून, येथे भारतीय कापड, कलाकुसर, निसर्ग आणि संस्कृती यांचा जादुई मेळ दिसून येतो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search