Next
जुळ्या बालमुनींच्या शतावधानाने श्रोते अचंबित
दहा वर्षांच्या मुलांचे दहा भाषांमध्ये प्रवचन
BOI
Monday, December 03, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this story

अवघ्या दहा वर्षांचे जुळे बालमुनी नमिचंद्रसागर व नेमिचंद्रसागर

बेंगळुरू : एक-दोन नव्हे, तर तब्बल शंभर प्रश्न त्यांना सरळ आणि उलट्या क्रमाने विचारण्यात आले. त्यांची अगदी अचूक उत्तरे त्यांनी दिली. अवघ्या दहा वर्षांच्या या जुळ्या बालमुनींच्या बुद्धिसामर्थ्याने सारे सभागृह अवाक झाले होते. त्यांच्या अफलातून उत्तरांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. जैन धर्माच्या सागर समुदायातील नमिचंद्रसागर व नेमिचंद्रसागर या अवघ्या दहा वर्षांच्या जुळ्या बालमुनींनी शतावधान प्रयोगादरम्यान आपल्या अफाट बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले. 

श्री नाकोडा पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने बेंगळुरू येथे नुकतेच या बालशतावधान प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. हे दोघे भाऊ आचार्य नयनचंद्रसागर यांचे शिष्य युवाशतावधानी अभिनंदनचंद्रसागर यांचे शिष्य आहेत. शतावधान प्रयोगाने श्रोत्यांना थक्क केले. या वेळी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला, शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासमा, ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा यांच्यासह हिंदू, मुस्लीम, शीख धर्मातील धर्मगुरुंसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बालशतावधानी व बहुविधभाषाभाषी या सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेल्या पदवीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दोघांना प्रदान करण्यात आले. 

बालमुनी नमिचंद्रसागर व नेमिचंद्रसागर यांना सुवर्णअक्षरात लिहिलेले पदवी प्रमाणपत्र प्रदान करताना कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला, शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासमा,मनिंदरसिंग बिट्टा आदी मान्यवर.

भूपेंद्रसिंग चुडासमा यांच्या प्रश्नाने बालशतावधनाची सुरुवात झाली. त्यानंतर एकापाठोपाठ शंभर प्रश्नांची विचारणा झाली. सरळ आणि उलट्या क्रमाने प्रश्न विचारले गेले. त्यांच्या अफलातून उत्तरांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. गणित, अंकगणित आणि इतर विविध विषयातील प्रश्नांच्या अचूक उत्तरांनी श्रोते भारावून गेले. संस्कृत, प्राकृत, कन्नड, उर्दू, मारवाडी, हिंदी, गुजराती, पंजाबी, मराठी व इंग्रजी या दहा भाषांमध्ये दोघांनीही प्रवचन करीत, सुवर्णाक्षरात इतिहास लिहिला. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link